शेती

सोयाबीनचा हमीभाव ५१०० करा कृषी मूल्य आयोगाकडे राज्य सरकारची मागणी


वेगवान नाशिक/अरुण थोरे

मुंबई: १४ जुन २०२४

कृषी मूल्य आयोग व राज्य सरकार यांच्यात झालेल्या बैठकीत सोयाबीनसह इतर शेतमालाचे हमीभावामध्ये वाढ करावी अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

 

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

११ जून २०२४ रोजी राज्य सरकार व कृषीमूल्य आयोग यांच्यात मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहात ही बैठक झाली. बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते यावेळी त्यांनी कृषी मूल्य आयोगाकडे सोयाबीनला ५१०० रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी केली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये उत्पादन खर्च जास्त असल्याने मजुरी व वातावरणीय बदलांचा परिणाम हा पिकाच्या उत्पादन खर्चात वाढ करत असल्याचं राज्य सरकार कडुन सांगण्यात आलं आहे.

 

काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेतीविरोधी धोरणामुळे उत्तर महाराष्ट्रातील कांदा व मराठवाड्यातील कापूस व सोयाबीनच्या दरामुळे महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सोयाबीनच्या हमीभावात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या सोयाबीनचे दर हे ४००० ते ४३०० रुपये इतके कमी असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात असल्याचा बोललं जात आहे. याबाबत कृषी मूल्य आयोग काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.


अरुण थोरे

अरुण थोरे  गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून  शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!