सिन्नरःमहिलेने रस्त्यासाठी सर्वांसमोर विहीरीत मारली उडी
वेगवान नाशिक
सिन्नर, ता. 14 जून 2024 – आज सकाळी दत्तात्रय गवांदे यांचा शेतातुन ने काही नेते व पोलिसांना हाताशी धरून दांडगाईने रस्ता तयार केला . याच वेळी दतु गवांदे व त्यांच्या पत्नी सौ शिल्पा गवांदे व मुलगी यांनी त्यांना विरोध केला.
परंतु गावातील सरपंच, पोलीस पाटील.व वावी पोलिस ठाण्याचे काही पोलिस कर्मचारी यांना हाताशी धरून गवांदे यांच्या विरोधाला न जुमानता रस्ता तयार केला. असा आरोपी गवांदे कुटूबीय करत आहे. दरम्यान सौ.शिल्पा गवांदे या महिलेने जवळील असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचविण्यासाठी प्रयत्न केले असता त्यांना त्यात यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच वावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व इतर कर्मचार्यासह धाव घेतली असून गावकर्याच्या मदतीने सदर महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदनासाठी सिन्नर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याच वेळी समोरील बाजुवाले आरोपी तात्काळ अटक करण्यात आली आहे व पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करीत आहे.