नाशिक क्राईम

निवेदन देऊनही कारवाई नाममात्र, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; पत्ते अवैद्य दारूविक्री बंद करण्याची मागणी


वेगवान नाशिक / बाबा पवार

 

देवळा : तालुक्यातील भऊर गाव, चौफुली तसेच परिसरात  होणारी अवैद्य दारू विक्री, वेगवेगळ्या ठिकाणी पत्ते खेळणारे यांचे प्रमाण वाढले असून, हे प्रकार बंद व्हावे याबाबत भऊर ग्रामस्थ यांनी दि.२९ मे रोजी देवळा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना निवेदन दिले होते. मात्र या बाबत फक्त नाममात्र कारवाई झाल्याने नेमका यामागे कुणाचा वरदहस्त आहे की काही अर्थ दडला आहे असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दि.२९ मे रोजी या बाबत भऊर गावातील महिला व पुरुष ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या केलेले निवेदन देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना ग्रामस्थांनी दिले होते. त्यानंतर गावात पोलीस गाडी येऊन नाममात्र फेऱ्या मारून गेली. मात्र प्रत्यक्षात कुठेही धकड कारवाई करण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याच निवेदनासोबत काँग्रेस, शिवसेना,  राष्ट्रवादी, मनसे, या पक्षांनी देखील या बाबत पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. मध्यंतरी मतमोजणी असल्याने पोलीस संख्याबळ कमी होते. दि. ४ रोजी मतमोजणी झाल्यावर एक दोन दिवसानंतर कारवाईचा बडगा उगारला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, पोलिसांनी आजतागायत कुठलेही ठोस अशी पाऊले उचलली नसल्याची खंत पक्षातील पदाधिकारी यांनी व्यक्त केली आहे.
वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या भूमिकेकडे लक्ष –
पोलिसांची टाळाटाळ नेमकी का? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केल्याने आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या बाबत लक्ष घालतात का? लोकप्रतिनिधी पोलिसांना जाब विचारतील का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने भऊर ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.
पोलिसांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह :
एकंदरीत अवैद्य दारूविक्री व पत्ते खेळणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी असतांना देवळा पोलीस धडक कारवाई करत नसल्याने यामागे कुणाचा वरदहस्त आहे की काही अर्थ दडला आहे अशी शंका भऊर ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे.

प्रतिक्रिया :  संबंधित ठिकाणी आमच्या पथकाने दोन वेळा रेड केली असून त्या ठिकाणी काही मिळून आले नाही, सदर गोष्टीबाबत चौकशी करून काही आढळून आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल.
–  ज्ञानेश्वर जाधव, पोलीस निरीक्षक देवळा

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin


बाबा पवार

गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!