सरकारी माहिती
या मार्गावर धावणार २ विशेष एकेरी ट्रेन
रेल्वे प्रवाशांच्या गरजेनुसार दि.१५ व १६ जून रोजी

Wegwan nashik/ वेगवान नाशिक 14 जून :-
मध्य रेल्वे प्रवाशांच्या गरजेनुसार २ विशेष एकेरी ट्रेन चालवणार आहे
मध्य रेल्वे प्रवाशांच्या गरजेनुसार आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते गुवाहाटी आणि मनमाड ते गुवाहाटी दरम्यान एकेरी विशेष ट्रेन सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेतः
१) मुंबई ते गुवाहाटी एकेरी विशेष ट्रेन
गाडी क्रमांक ०१०९७ अतिजलद एकेरी विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. १५.०६.२०२४ रोजी १३.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १६.०० वाजता गुवाहाटी येथे पोहचेल.
थांबे : कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगडा,झारसुगुडा, राउलकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खरगपूर, दानकुनी, बर्धमान, बोलपूर शांतिनिकेतन, रामपूरहट, पाकूर, मालदा टाउन, न्यू जलपाईगुडी, सिलिगुरी,हसीमारा, न्यू अलीपूर द्वार, न्यू बोनगाईगाव आणि कामाख्या.
संरचना: एक वातानुकूलित तृतीय, १९ शयनयान आणि 2 लगेज कम गार्ड ब्रेक वैन.
२) मनमाड ते गुवाहाटी एकेरी विशेष ट्रेन
गाडी क्रमांक ०१०९५ अतिजलद एकेरी विशेष मनमाड येथून दि. १६.०६.२०२४ रोजी ११.१० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०९.३० वाजता गुवाहाटी येथे पोहचेल.
थांबे : मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पंडित दिन दयाल उपाध्याय, पटना, मोकामा, जमालपूर, भागलपूर, मालदा टाउन, किशनगंज, न्यू जलपाईगुडी,न्यू कूच बिहार, न्यू अलीपूर द्वार आणि रंगिया.
संरचना: एक वातानुकूलित तृतीय, १९ शयनयान आणि 2 लगेज कम गार्ड ब्रेक वैन.
आरक्षण: सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कावर सुरू आहे .
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
