नाशिक ग्रामीण
निफाड तालुक्यात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला
वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
निफाड: , ता. 13 जून 24 – निफाड तालुक्यात शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे.
एसटीतील बदल्यांसाठी आता या तंत्रज्ञानाचा होणार वापर
निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील आहेरगाव पालखेड रस्त्यावरील रसाळ वस्तीवर सकाळी आठ वाजेच्या सुमारास दत्तात्रय पुंजा रसाळ यांच्यावर द्राक्ष बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केल्याने हाताला गंभीर इजा झाली आहे.
५० मोबाइलचा शोध घेण्यास मुंबई नाका पोलिसांना यश
तर बिबट्याला हुसकवण्यासाठी या परिसरातील तरुणांनी आरडाओरड केल्याने त्याने जमावाला बघून जखमी रसाळ यांना सोडून पलायन केले. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पिंपळगाव येथे दवाखान्यांमध्ये हलवण्यात आले