नाशिक क्राईम
५० मोबाइलचा शोध घेण्यास मुंबई नाका पोलिसांना यश
५० मोबाइलचा शोध घेण्यास मुंबई नाका पोलिसांना यश

वेगवान नाशिक /नाशिक नितिन चव्हाण ता;, १२ जुन २०२४
नाशिक परिसरात मोबाइल चोरी व गहाळ होण्याच्या अनेक तक्रारी दैनंदिन विविध पोलीस ठाण्यास प्राप्त होत असल्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सी.ई.आय. आर. प्रणाली अंतर्गत गहाळ झालेल्या मोबाइलचा शोध घेण्याबाबत शहरातील पोलीस ठाण्यास आले.
असून, त्या अनुषंगाने त्या मुंबई नाका पोलीस ठाण्याचे शोध पथकाचे पोलीस अंमलदार
समीर शेख यांनी सी.इ.आय.आर. प्रणालीद्वारे १० लाख ४० हजार रुपये किमतीचे ५० महागडे मोबाइल फोन शोधून काढले.
शोधून काढलेले मोबाइल फोन तक्रारदारांना मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते परत करण्यात आले.
महागड्या कंपन्यांचे तक्रारदाराचे मोबाइल त्यांना परत मिळाल्यामुळे त्यांनी नाशिक शहर पोलिसांचे विशेष आभार व्यक्त केले.
