घरचं झालं थोडं .. ! व्याह्यानं धाडलं ” घोडं “

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर , ता. 12 जून 24 – शहा,पाथरे,मिरगाव,सायाळे,वावी, निर्हाळे गुळवंच,पिंपरवाडी, मिरगाव, रामपुर, परिसरात चरा व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहे
उदारनिर्वाहसाठी स्थलांतर आणि चाराटंचाई मुळे जनावरे विकण्याची वेळ आली असतांनाच बाहेरील राज्यातून विशेषतः राज्यस्थान प्रदेशातुन काठीयावाड भागातील गिर जातीच्या जनावरे गाई, म्हशी, यांचे प्रचंड प्रमाणात लोंढे चे लोंढे महाराष्ट्रातील विविध भागात चोऱ्यांचे शोधार्थ फिरत आहे,व संपूर्ण परिसर पिंजुन काढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील स्थानिक शेतकरी वर्गातील छोटेमोठे जनावरांना चारा च शिल्लक राहत नसल्याने जनावरे विकण्याची वेळ आली आहे,
सिन्नर तालुका तसा पाण्यासाठी पुर्णपणे उपेक्षित राहिला आहे,तसे पाहिले तर तालुक्यात मोठीं राजकीय जागृती आहे, सर्वांगीण विकास
सर्वांगीण विकास व्हावा.आपले हक्क अबाधित हवेत म्हणून त्या – त्या पक्षाचे उमेदवार.पुढारीमंडळी.जोरदार निदर्शने करतात.पोटतिडकिने बेकारांना नोकर्या मिळाल्या पाहिजेत. भाकरीचा प्रश्न सोडवला पाहिजे म्हणून लढे उभारतात.रस्तारोको करतात.पण तालुक्यातील पुर्व भागातील जनतेचा विचार च कोणी करीत नाही.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून जवळपास ६६ वर्ष होऊनही महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये अशी च भयाण वास्तव समोर येत आहे.एवढे असूनही सिन्नर तालुका अति मागासलेलाच राहिला.यांच्या गरजा.सोयी सुविधांचा विचार करण्याचे भान कोणासच दिसत नाही असे दिसते.
ग्रामीण भागातील स्थानिक शेतकरी वर्ग मात्र अद्याप कोणतीही तक्रार केली नाही.नव्हे तक्रार करायची कोणाकडे.. जेव्हा कुंपणच शेत खातं,,, अशी भावना सर्वसामान्य जनतेची झाली आहे.
