कुमार आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात नाशिकच्या पै.रोहन भडांगेची निवड
वेगवान नाशिक/ Wegwan Nashik, देवळाली कॅम्प.१२ जून :-
१७ वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ओमान ( जॅार्डन ) येथे दिनांक २२ ते ३० जुन दरम्यान होत आहे.या आशियाई कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाची निवड चाचणी दिल्ली येथे नुकतीच संपन्न झाली.या निवड चाचणीत महाराष्ट्राच्या ४ कुस्तीगीरांची निवड झाली.
भारतीय फ्री-स्टाईलच्या कुस्ती संघात निवड झालेले कुस्तीगीर पैकी रोहन भडांगे हा पैलवान नाशिकचा असुन तो पुण्यातील जाणता राजा कुस्ती केंद्रात सराव करत असतो.
भारतीय कुस्ती संघात निवड झालेल्या चार ही कुस्तीगीरांचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै.रामदासभाऊ तडस , उपाध्यक्ष खासदार पै.मुरलीधर मोहोळ , पै.हनुमंत गावडे , कार्याध्यक्ष पै.संदीप भोंडवे , सरचिटणीस हिंदकेसरी पै.योगेश दोडके , पै.विलास कथुरे जिल्हाध्यक्ष ॲड.विशाल बलकवडे यांनी अभिनंदन केले