मालेगाव तालुक्यात गढकलिका व्यापारी संकुल ला लागली आग
वेगवान नाशिक /
मालेगाव, ता. 11 जून – येथील गढकलिका व्यापारी संकुल ला रात्री ९ वाजता भिषण आग लागली. यामध्ये दोन तिन दुकानें संपुर्ण जळून खाक झाले.आगीचे नेमके कारण समजले नसुन यामध्ये माऊली मोबाईल शॉप हे पूर्णतः जळून खाक झाले आहे.काल झालेल्या पावसामुळे काल दुपार पासून वीज पुरवठा खंडित झाला होता.
चोवीस तास उलटूनही वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. वीज वितरण कंपनीच्या शर्तीच्या प्रयत्नात रात्री वीज पुरवठा सुरु झाला.व्यापारी संकुल समोर असलेल्या नागरिकांना आग लागली असे लक्षात आले. परंतु आग आटोक्यात येई पर्यंतप्रविण पवार यांचे मालकीचे माऊली मोबाईल शॉप व श्रीकांत आहेर यांचे शिवंभु केक शॉप हे आगीत भस्मसात झाले.
मालेगाव येथील अग्निशमन दलाने पाचरण केले असल्यामुळे लागलेली आग आटोक्यात आली. यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. सौंदाणे गावातील तरुण युवक यांचे मुळे हि आग आटोक्यात आणण्यात मदत झाली. व्यापारी संकुल परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले होते. परंतु आग आटोक्यात आलेने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.