लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते वाराणसी उन्हाळी विशेष गाडी
वेगवान नाशिक/Wegwan Nashik ११ जून,देवळाली कॅम्प:-
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते वाराणसी दरम्यान उन्हाळी विशेष गाडी रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः
लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते वाराणसी उन्हाळी विशेष गाडी सुरू करण्यात येणार आहे
04229 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक 14.06.2024 रोजी 13.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 23.45 वाजता वाराणसी येथे पोहोचेल (01 फेरी)
04230 विशेष वाराणसी येथून दिनांक 12.06.2024 रोजी 22.20 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 10.30 वाजता लोकमान्य तिलक टर्मिनस येथे पोहोचेल (01 फेरी)
संरचना: – एक वातानुकूलित-2 टियर, एक वातानुकूलित -3 टियर, 07 शयनयान श्रेणी, 10 द्वितीय श्रेणी , 2 लगेज कम गार्ड ब्रेक वैन।
आरक्षण: उन्हाळी विशेष ट्रेन 04229 साठी विशेष शुल्कावर बुकिंग दि. 12.06.2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.