भावपूर्ण श्रद्धांजली चा व्हाट्सअप स्टेटस… अन दोघा मित्रांनी उचलले टोकाचे पाऊल…
भावपूर्ण श्रद्धांजली चा व्हाट्सअप स्टेटस... अन दोघा मित्रांनी उचलले टोकाचे पाऊल...
वेगवान नाशिक/ नाशिक:, नितीन चव्हाण ता:,९जून २०२४
नाशिकरोड रेल्वे मालधक्का रोड वालदेवी नदीच्या रेल्वपुलावर दोन युवकांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे .
सविस्तर माहिती अशी की आज दिनांक 8 जून रोजी. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास संकेत राठोड, व त्याचा साथीदार सचिन दिलीप करवर हे दोघेही कॉलेजचे ऍडमिशन घेण्यासाठी घरी सांगून निघाले होते
मात्र काही वेळानंतर या दोघांनी एकमेकांसोबत फोटो काढून आपल्या मोबाईलच्या व्हाट्सअप स्टेटस वर भावपूर्ण श्रद्धांजली असे लिहून फोटो ठेवला होता.
काही मित्रांनी हा स्टेटस बघितला आणि त्यावेळेसच परिसरात अचानक खबर आल्याने त्यांच्या मित्रांनी रेल्वे रुळाकडे धाव घेतली
बाजूला असलेल्या मालधक्का गोडाऊन मधील कर्मचाऱ्यांना देखील रेल्वे रुळावर अपघात झाल्याने त्यांनी देखील पाहण्यासाठी त्या ठिकाणी धाव घेतली
परिसरातील राहणाऱ्या एका व्यक्तीच्या निदर्शनात आल्याने मृत अवस्थेत असलेले हे दोन्हीही युवक आपल्या परिसरातील असल्यामुळे त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना व पोलीसांना माहिती दिली
या घटनेत आत्महत्या करणारे युवक नामे संकेत राठोड व सचिन दिलीप करवर. हे दोघेही राहणार जुना मालधक्कारोड एस. के. पांडे. शाळेजवळ म्हसोबा नगर गीते मळा नाशिकरोड येथे राहत होते..या घटनेमुळे म्हसोबा नगर गीते मळा परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
या दोन्हीही तरुणांचे पार्थिव शवच्छादनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,या दोघा युवकांनी आत्महत्या का केली हे अद्यापही समजलेले नसून पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.