जाब विचारल्याच्या कारणावरून मायलेकीस मारहाण….
जाब विचारल्याच्या कारणावरून मायलेकीस मारहाण....

वेगवान नाशिक/ नाशिक:, नितीन चव्हाण ता:,८जून २०२४
औद्योगिक वसाहतीतील अंबड लिंकरोड भागात मुलीच्या छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या मायलेकींचा विनयभंग करीत शेजाऱ्यांनी कुटुंबीयास मारहाण केल्याची घटना घडली.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोस्को आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तेरा वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे.
शेर खान, आवेद खान, इजारूल खान व फारूख खान (रा. विराटनगर, अंबड लिंकरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पीडिता व संशयित एकाच सोसायटीत वास्तव्यास असून गुरूवारी (दि.६) रात्री ती इमारतीच्या जीन्यातून जात असतांना शेर खान या युवकाने पाठीमागून येवून तिचा विनयभंग केला.
या बाबत मुलीने आपल्या कुटूंबियाकडे आपबिती कथन
केल्याने कुटुंबियांनी मुलीशी केलेल्या छेडखानीचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी शिवीगाळ व दमदाटी करीत कुटुंबियास लोखंडी सळई, फावड्याच्या दांडक्याने बेदम मारहाण केली.
या घटनेत मुलीच्या आईला
निर्वस्त्र करून विनयभंग करण्यात आले असून या हाणामारीत मुलीच्या आई वडिलांसह आजी आजोबाही जखमी झाले आहेत.
यावेळी पोलीसात गेले तर कुटुंबियास जीवे ठार मारू अशी धमकी संशयितांनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक संदिप शेवाळे करीत आहेत.
