येवला तालुक्यात पावसाची दमदार हजेरी, वादळी वाऱ्या सह वीज पडून जीवतहाणी
येवला तालुक्यात पावसाची दमदार हजेरी तर तालुक्यात वादळी वाऱ्या सह वीज पडून म्हैस ठार
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला /दिनांक 9जून 2024/येवला तालुक्यातील पूर्व भागातील रेंडाळे येथे वीज पडून येथील शेतकरी सिताराम वाल्मिक आहेर यांच्या शेतातील म्हैस वर वीज पडून म्हैस ठार झाली आहे
यात शेतकऱ्यांनचे नुकसान झाले आहे
दोन वर्षांपासून येवला तालुक्याला हुलकवणी देणाऱ्या पावसाने आज येवला तालुक्यात विजांच्या कडकडाटसह जोरदार हजेरी लावली
आज सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान अचानकपणे काळे ढग जमा झाले आणि जोरदार पाऊसला सुरुवात झाली विजांच्या कडकडाट, ढगाच्या कडकडात आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली
आज पडलेल्या पावसाने मात्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असुन शेतकऱ्यांना देखील या पावसाचा मोठा दिलासा मिळणारच आहे
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये