गोविंदनगरला दुभाजकाचा अडथळा होणार दूर:, महानगरप्रमुख तिदमेंच्या पाठपुराव्याला यश
गोविंदनगरला दुभाजकाचा अडथळा होणार दूर:, महानगरप्रमुख तिदमेंच्या पाठपुराव्याला यश
वेगवान नाशिक/ नाशिक:, नितीन चव्हाण ता:,९जून २०२४
गोविंदनगर रस्त्यावरील नयनतारा इमारतीसमोरील रस्ता दुभाजक हटविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
यामुळे वाहतूक सुरळीत होऊन राँगसाइडने जाणाऱ्या वाहनांना पायबंद बसेल, अपघातांचे प्रमाण कमी होईल.
प्रभाग २४ मधील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या प्रयत्नांना यश आले आहे.
इंडिगो पार्कसमोरून यू टर्नने वळसा टाळण्यासाठी, बडदेनगर, पांगरे मळा, जुने सिडको भागात जाण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांसह अन्य वाहने आर. डी. सर्कलहून चुकीच्या
मागनि जातात.
यामुळे येथे वारंवार अपघात होतात. सकाळ, सायंकाळ जॉगिंग ट्रॅकवर जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते.
इमारतीसमोरील नयनतारा दुभाजक हटविल्यास जुने सिडकोत जाण्यासाठी सरळ रस्ता खुला होईल. अपघात व जीवितहानी टळेल.
महापालिकेच्या दोन विभागांतील वाद व असमन्वयामुळे हे काम थांबले होते. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे अखेर हा प्रश्न मार्गी लागला आहे.
दुभाजक हटवून बडदेनगर, भुजबळ फार्मकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याच्या कामाला सुरुवात झाली
आहे.
जगतापनगर, कर्मयोगीनगर,
बाजीरावनगर, गोविंदनगरसह शहरातील अन्य भागांतील नागरिकांची गैरसोय यामुळे दूर झाली आहे.
शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी आपल्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगितले आहे.
जुने सिडको,
कर्मयोगीनगरमधील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे. घरी परत येताना आता आरडी सर्कलहून
नयनतारा सोसायटी येथून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानाकडे येण्याचा मार्ग सुरू होणार आहे. त्यांना आता चुकीच्या मार्गाने यावे लागणार नाही. हे दुभाजक हटविल्याने कोशिकोनगर, युफोरिया जिम परिसरातील तसेच गोविंदनगर येथील सागर स्वीट्स चौकातील वाहतुकीची वर्दळ कमी होण्यास मदत होईल, असे तिदमे यांनी स्पष्ट केले.