नाशिक शहर

कोण म्हणतं पाणीटंचाई आहे..माजी.महापौरांच्या प्रभागात हजारो लिटर पाण्याचा अपव्याय….

कोण म्हणतं पाणीटंचाई आहे..माजी.महापौरांच्या प्रभागात हजारो लिटर पाण्याचा अपव्याय....


वेगवान नाशिक/ नाशिक : नितीन चव्हाण:, ता ८ जून २०२४

कोण म्हणतं नाशिकमध्ये पाणी टंचाई आहे.प्रभाग क्र.२३ मधील माजी महापौरांच्या प्रभागात मोठ्या व्यासाच्या जल वाहिनीतून दररोज 50 ते 60 हजार लिटर पाणी वाया जात आहे.

यामुळे या परिसरातील 60 हजार नागरिकांना पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

गांधीनगर जलकुंभ येथून इंदिरानगर,सिडको येथे वडाळा डीजीपी रोड जॉगिंग ट्रॅक येथून जाणाऱ्या मोठ्या व्यासाच्या जल वाहिनीतून व्हॉल्व्ह द्वारे दुसऱ्या पाइपलाइनला पाणी वितरीत होते.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

या पाईप लाइन मधून पाणी गळती होतआहे. गळती झालेले पाणी इतरत्र रस्त्यावर वाहत आहे.

या बाबत नागरिकांनी महानगर पालिकेकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले गेल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

या गळतीमुळे चेंबर जवळ मोठे डबके तयार झाले असून तेच दुर्गंधीयुक्त पाणी पुढे वितरित होत आहे.

या ठिकाणी डास निर्मितीस मुबलक वातावरण तयार झाले आहे.

गळती होणा-या पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

या गळती बाबत मनपा विभागीय आयुक्त रवींद्र धारणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले. बाराही महिने हा वॉल लीक असतो वारंवार तक्रार करून सुद्धा व असंख्य वेळेस वृत्तपत्रात बातम्या येऊन सुद्धा संबंधित विभागाचे अधिकारी काम स चुकारपणा करतात.

वॉलची दुरुस्ती करत नाहीत. या बाबत संबधित मनपा अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना विचारलं तर ते सांगतात की तिथली लोकॅलिटी खराब आहे.

लोक मुद्दाम व्हॉल्व्ह खराब करतात असे सांगून आपला कामचुकारपणा लपवण्या साठी तिथल्या लोकांवरती आरोप करून उडवा उडवीची उत्तरे देतात.

वर्षभरात व्हॉल्व्ह रिपेअर केले असेल तर त्याची माहिती देण्यात यावी म्हणजे कळेल की वर्षभरात किती वेळा व्हॉल्व्ह दुरुस्त केला आणि त्याचं पर्मनंट सोल्युशन कधी काढणार हे कळवण्यात यावं.आशी मागणी नागरिकांनी केलीआहे.

—————-
प्रतिक्रिया

सदर व्हॉल्व्ह हा जॉगिंग ट्रॅक वरती उंचावर असून त्याला चेंबर करून भिंत बांधलेली आहे.तिथे कोणी नागरिक जात नाहीत संबंधित अधिकारी त्यांचं काम लपवण्यासाठी तिथली लोकॅलिटी खराब आहे म्हणून वॉल खराब होतो हे उत्तर अपेक्षित नाही .

जय कोतवाल रहिवाशी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!