एकीचा पाय घसरला दुसरी मदतीसाठी धावली, तिही बुडाली
वेगवान नाशिक:
नाशिक/८ जून २०२४
त्र्यंबकेश्वर मधील प्रसिद्ध बिल व तीर्थावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन तेरा वर्षीय मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की त्र्यंबकेश्वर येथील नील पर्वताच्या मागील पायथ्यालगत प्रसिद्ध बिल्व तीर्थ असून, सध्या पाण्याचा तुटवडा असल्याने बऱ्याच महिला या तीर्थावर कपडे धुण्यासाठी जातात.
अशाच या दोन मुली तनुजा युवराज कोरडे (वय १३) व अर्चना बाळू धनगर(वय १३) या मुली सोबत कपडे धुण्यासाठी गेले होत्या. त्यातील एकीचा पाय घसरल्याने दुसरी तीला वाचवायला गेली असता, दोघींचा पाण्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्यांना अर्ध्या तासानंतर बाहेर काढले व त्यांना त्र्यंबकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
नाशिक जिल्हा रुग्णालयात शवाविच्छादनासाठी पाठवण्यात आले असून त्रंबकेश्वर पोलीस सात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.