आज दि.७ रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, भुसावळ येथे “एक अनोखा उपक्रम – मिशन सहयोग” आयोजित करण्यात आला. मंडळावर अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांनी अनुकंपा तत्वावर नियुक्त केलेल्या उमेदवारांशी विशेषत: लहान मुले असलेल्या महिला उमेदवारांशी संवाद साधला तसेच त्यांना रेल्वेच्या कामासोबतच कुटुंबाच्या जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्यात याविषयी मार्गदर्शन केले तसेच उपस्थित अधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले. नवनियुक्त अनुकंपा उमेदवारांना संवेदनशील बनवण्याचा आणि त्यांच्या पालकाच्या निधनानंतर शोकग्रस्त परिस्थितीत उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मंडळाचा हा एक अनोखा उपक्रम आहे.
यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) श्री.सुनीलकुमार सुमन, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) मुकेशकुमार मीना, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी श्री.एन. एस. काझी व सर्व सहायक कर्मचारी अधिकारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्ही.एस. वडनेरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरती विभाग व कल्याण विभाग, कार्मिक शाखा यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी, अनुकंपा तत्वावर नियुक्त केलेल्या उमेदवारांनी सुरळीत भरती प्रक्रिया पार पाडल्याबद्दल विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचे आभार व्यक्त केले.