नाशिक ग्रामीण
नाशिक जिल्ह्यात पावसाचा धूमाकुळ, रस्ते बंद, घरे जमीनदोस्त

वेगवान नाशिक
नाशिक, ता. 7 जून 2024 – करंजाडी खो-यात सायंकाळी सहाच्या सुमारास वीजेच्या कडकडाटसह वादळी वारा व पावसाने जोरदार हजेरी लावली.
वादळात अनेक घरांचे पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूकही ठप्प झाली आहे. शेतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चाळीचे पत्रे उडाल्याने साठवलेला कांदा भिजून पडला आहे.
वादळाचा तडाखा वीजेच्या खांबानांही बसला असून बरेचशे जमीनदोस्त झाले आहेत.
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे जोरदार पाऊस झाला असून वादळमुळेझाडे पडल्याच्या घटना घडल्या आहे.
