नाशिक शहर
देवळालीसह पंचक्रोशीत पावसाची जोरदार हजेरी
बळीराजा सुखावला तर वीज गुल देवळालीसह पंचक्रोशीत पावसाची जोरदार हजेरी

वेगवान नाशिक / Wegwan Nashik
देवळाली कॅम्प, ता. 6 जून 2024 – आज गुरूवार दि.७ रोजी देवळाली कॅम्प शहरासह नाशिकरोड, सिन्नर परिसरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह पाऊस झाला.
भारती पवारांच्या बाबत अजीत पवारांच्या आमदारांनी हात राखला ?
काल सकाळच्या सुमारासच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. मुंबई पुणे येथे हजेरी लावल्यानंतर देवळालीच्या पंचक्रोशीत देखील मृगाच्या पावसाच्या सरींनी हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह नागरिकही सुखावले.
अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. पाच वाजल्यापासूनच पूर्वेकडून मान्सूनचे वारे वाहत होते त्यात अचानक बाजूने आभाळ भरून आले. सकाळपासूनच परिसरात उष्णता निर्माण झालेली होती. सायंकाळच्या सुमारास दैनंदिन कामे उरकून घरी जाणारा कामगार वर्ग अचानक आलेल्या या पावसाने आसरा मिळेल त्या ठिकाणी उभा असल्याचे चित्र दिसून आले.
जोरदार सरींमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात होता. उन्हाळा असल्याने नागरिकांना घामाच्या धाराही सहन कराव्या लागल्या. लामरोडसह विविध रस्त्यांवर पाण्याचे तळे साचलेले पहायला मिळाले. तर विविध सोसायटी व लॉन्सच्या गेटवर पाण्याचे तळे साचलेले पाहायला मिळाले. या पावसाने आता खरीप हंगामातील शेतीच्या कामांना वेग येणार आहे.
