भुसावळ विभागात आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जनजागृती दिन साजरा करण्यात आला.
दिनांक 06.06.2024 रोजी भुसावळ विभागात आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जनजागृती दिन साजरा करण्यात आला. या दिवशी विभागांतर्गत येणाऱ्या सर्व लेव्हल क्रॉसिंग गेटवर गेट ओलांडताना घ्यावयाची काळजी याबाबत रस्ता वापरकर्ते व परिसरातील नागरिकांना जागरुक करण्यात आले. पोस्टर आणि पथनाट्याच्या माध्यमातून संरक्षा विभागाने नागरिकांना रेल्वे लेव्हल क्रॉसिंगवर घ्यावयाच्या खबरदारीची माहिती दिली. जळगाव येथील लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 148 येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी पथनाट्य सादर करून नियमानुसार आणि काळजीपूर्वक रुळ ओलांडण्याबाबत रेल्वे कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्यांना प्रबोधन केले. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) श्री सुनीलकुमार सुमन, स्टेशन व्यवस्थापक जळगाव, आरपीएफ निरीक्षक, संरक्षा विभागाचे निरीक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.