भारती पवारांच्या बाबत अजीत पवारांच्या आमदारांनी हात राखला ?
वेगवान नाशिक / अरुण थोरे
नाशिक, ता. 6 जून
कांदा उत्पादकांची नाराजी व मराठा आरक्षणाने भारती पवारांचा पराभव झाल्याचं सांगितलं जातं. सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात असताना, फक्त नांदगाव चे आमदार सुहास कांदे व चांदवड चे आमदार राहुल आहेर यांच्या मतदार संघात पवारांना आघाडी दिसुन आली.
देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार ?
मात्र तेच अजित पवार गटाचे आमदरा असणा-या चारही विधानसभा मतदार संघात भारती पवारांना कमी मतदान मिळाले याची चर्चा आताा तालुकाभर सुरु आहे. सहास कांदे व राहुल आहेर यांनी मात्र भारती पवारांना आघाडी दिल्याचे दिसून आले.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांचा भास्कर भगरे यांनी दारूण पराभव केला. या पराभवाची कारणमीमांसा सांगताना मराठा आरक्षण व कांदा प्रश्नाबाबत नाराजी सांगीतली जाते. मात्र नांदगाव व चांदवड दोन्ही मतदारसंघ मराठाबहुल व कांदा उत्पादक आहेत. (
नांदगाव व चांदवड तालुक्यात सर्वाधिक कांद्याचे पिक घेतले जाते) असे असताना सुहास कांदेच्या नांदगाव मतदारसंघात ४१,६६५ आहेरांच्या चांदवड मतदार संघात १६,१४७ मतांची आघाडी मिळाली असुन, आमदार कांदेंनी आगामी विधानसभा सुकर केल्याची बोललं जातं आहे. तर राहुल आहेरांनी आमदारकी साठी स्वपक्षीयांची स्पर्धा संपुष्टात आणल्याची चर्चा आहे.
याउलट कळवणचे नितीन पवार, दिंडोरीचे नरहरी हिरवळ, निफाडचे दिलीप बनकर,व येवल्याचे छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात भास्कर भगरेंना आघाडी दिसून आल्याने, अजित पवार गटाने युतीधर्म न पाळल्याची चर्चा खरी की, कांदा उत्पादक व मराठा नाराजी खरी हा चर्चेचा विषय ठरला आहे.
नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात भुजबळांवर आरोप केला होता की, भुजबळांचे कार्यकर्ते तुतारीचं काम करतात, त्यानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अजित पवार गट भारती पवारांच्या प्रचारात सक्रिय नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते त्याचाच परिणाम दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर झाल्याचे बोललं जात आहे कळवण निफाड दिंडोरी व येवला या मतदारसंघात भारती पवार पिछाडीवर असल्याचे चित्र निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले