Life Style

पर्यावरण दिनी काय सांगताय…आपलं पर्यावरण संस्थेचे शेखर गायकवाड सर जाणून घ्या विशेष लेखातून

पर्यावरणातून असा होतो शाश्वत विकास अन् रोजगार निर्मिती


वेगवान नाशिक/Wegwan Nashik…

पर्यावरणातून असा होतो शाश्वत विकास अन् रोजगार निर्मिती…

नाशिक-  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहराचा विकास करताना पर्यावरण शाश्वत विकास कसा करू शकतो व त्यानिमित्ताने रोजगार निर्माण कसा होऊ शकतो त्यावर टाकलेला प्रकाश झोत.
उद्योग.
(म्हणजेच नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीवर आधारित उद्योग व कृत्रिम उद्योग.)
उद्योगा विषयी केलेलं विचार मंथन.”
महाराष्ट्रा मध्ये अधून मधून उद्योग वाढीसाठी गाजत असलेल्या प्रश्नांचं चिंतन केल्यास नेमकं रोजगारासाठी कुठला उद्योग आपल्याला आपल्या शहरांसाठी गरजेचा आहे हे लक्षात येतं.
उदाहरणार्थ आपण आपल्या नासिक शहराचा विचार करु.
नाशिक शहराची भौगोलिक रचना आणि वातावरण, बघितल्यास, हे आपल्यासाठी नक्कीच एक निसर्गाचे वरदान आहे असं ठामपणे वाटते.
ज्यांना आज खरंच नाशिकच्या बेरोजगारी विषयी खूप अशी तळमळ आहे ?. नुसतं बेछूट औद्योगीकरण करून आपल्या शहराला बकाल करण्यापेक्षा आपण दुसऱ्या बाजूने विचार करण्याची गरज आहे.
नासिक शहर व परिसर, हे मुळातच निसर्गाने संपन्न व जगाच्या पाठीवर धार्मिक ऐतिहासिक आणि निसर्गाचा चारही बाजूंनी भरभरून वारसा असलेलं, थंड हवेचे नावाजलेले शहर आहे.
शहराच्या ह्या गुणवत्तेचा फायदा घेऊन कल्पकतेने ह्याचा आपण दुरदृष्टी ठेवून , unique cultural landscape ( अद्वितीय सांस्कृतिक लँडस्केप) लाभलेल्या परिसराचा , त्या अनुसरून विकास केल्यास यांचा नक्कीच येथील स्थानिक तळागाळातील नागरिकांन पासून सर्वा लोकांना चांगल्या प्रकारे रोजगार निर्माण झाल्याने फायदाच होईल. पर्यटन उद्योगा मुळे स्थानिक लोकांना छोट्या मोठ्या स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. आणि त्यामधून अजून चांगले रोजगार निर्माण होण्यास मदत होते. केवळ औद्योगीकरण करूनच रोजगार निर्मिती होते, हा चौकटीतला विचार, लोकांच्या डोक्यात असेल, तर माझ्यामते हा साफ चुकीचा आहे. औद्योगिकीकरणामुळे त्या त्या क्षेत्रातल्या उद्योगांना अनुसरून शिक्षण घेतलेले लोकांनाच तिथे नोकऱ्या उपलब्ध होतात त्यामुळे इतर शहरातून लोकांचा येथे येण्याचा कल वाढून, शहराचा अस्ताव्यस्त फुगोटा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे पुण्यासारख्या शहराला त्याचे परीणाम भोगावे लागतात.
औद्योगिकरण विस्तार करताना ठराविक शाहरांचाच विचार करावा तसेच ज्या शहरांना असं नैसर्गिक व सांस्कृतिक वैभव नाही, त्यामुळे त्यांच्याकडे त्या प्रकारचे उद्योग निर्माण होऊ शकणार नाहीत, अशा शहरांमध्ये औद्योगीकरण करून तिथल्या शहराचा विकास होण्यास मदत होईल. अशा दृष्टीने आपल्या महाराष्ट्रात जर आपण प्रत्येक शहराच्या अनुसरून त्या त्या धरतीवर पर्यटन उद्योग आणि औद्योगीकरण याचा जर नियोजन केलं. तर नक्कीच आपल्या राज्याचा समतोल, व शाश्वत विकास होण्यास चांगला हातभार लागेल व चांगल्या रोजगार निर्मितीमुळे येथील तरुणांना हाताला काम मिळेल.
जगाच्या पाठीवर असे काही देश व‌ शहर आहेत की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा औद्योगीकरण नाही, पण केवळ आणि केवळ त्यांच्या कडे असलेल्या नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीनुसार , पर्यटन उद्योगावर तेथील आर्थिक घडी ही खूप छान बसलेली आहे. मग का नाही म्हणून आपण आपल्या या शहराच्या भौगोलिक निसर्गाने नटलेल्या परिस्थितीचा, पौराणिक इतिहासाच्या रचनेचा फायदा घेऊन, जिथे जागतिक कीर्ती लाभलेला कुंभमेळ्यासारख पर्व होतो, अश्या ह्या शहराला अजून सुंदर ,चांगल्या प्रकारे रचना (design) करुन,जर सक्षम पर्यटन उद्योग आपण येथे उभा केला, तर नक्कीच इतर उद्योगांना जसे, बांधकाम व्यवसायिक, हॉटेल व्यवसायिक, ट्रॅव्हल एजन्सी, शेतीमाल, व छोटे छोटे स्वयंरोजगार, व त्यावर आधारित इतर पूरक व्यवसायांना आजुन चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. महत्त्वाचे म्हणजे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या विविध संधी निर्माण होतील. आणि तेवढी क्षमता आपल्याकडे आहे. फक्त ती ओळखून नियोजन करण्याची गरज आहे.
तपोवन, पंचवटी, गोदाकाठ, पांडवलेणी, चामार लेणी, सोमेश्वर, इत्यादी असे बर्याच शहरात व शहरा लगत इगतपुरी, अंजनेरी, त्रंबकेश्वर, वणी, रामशेज, नांदूरमध्यमेक्ष्वर व इतर असे, निसर्ग पर्यटनासाठी योग्य ठिकाण आहेत. त्यावर अपरिपक्व , घिसाडघाई चे निर्णय न घेता दुरदृष्टी ठेवून नियोजन बद्ध काम करण्याची गरज आहे.
आजुन काही ठिकाण आहेत जे आपण या पर्यटनामध्ये एक अॅग्रो टुरिझम आणि जंगल टुरिझम म्हणून नक्कीच अजून चांगल्या प्रकारे विकसित करू शकतो.
निसर्गोपचार केंद्र, त्याचा आपल्या शहराला फायदाच होईल.
पर्यटन विकासाच्या दृष्टीने नाशिक शहराची अजून जी काही घडी विस्कटलेली आहे, त्याचं सुनियोजन करून चांगला प्रकारे व्यवस्थापन करून काही बकाल झालेल्या वस्त्या नीटनेटके करण्याची गरज आहे.
नाशिक शहरात जे औद्योगीकरण आहे ते असंच आटोपशीर असले पाहिजे. तेथील वर्षांनुवर्ष बंद पडलेले व आजारी उद्योग, यांचे प्रश्न सोडवून इथे नवीन उद्योग उभारणीस वाव आहे.
हे सर्व सहज शक्य आहे, फक्त शासन, राजकीय ,दरबारी आणि नागरीकांनी हे करण्याची मानसिकता आवश्यक आहे.

🌳🌳🌳🌳

शेखर गायकवाड,
आपलं पर्यावरण संस्था,नाशिक
९४२२२६७८०१/९१३०२५७८०१ 🌳


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!