सरकारी माहिती

मध्य रेल्वेच्या या ११ कर्मचाऱ्यांना मिळाला महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार

सर्वाधिक ४ पुरस्कार भुसावळ विभागात ४, मुंबई विभागातील २, नागपूर विभागातील २, पुणे विभागातील २ आणि सोलापूर विभागातील १ कर्मचारी


मध्य रेल्वेच्या या ११ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार

 

Wegwan Nashik/वेगवान नाशिक. ५ जून :-

 

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री राम करन यादव यांनी दि. १४.०५.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई विभागातील २, भुसावळ विभागातील ४, नागपूर विभागातील २, पुणे विभागातील २ आणि सोलापूर विभागातील १ अशा ११ मध्य रेल्वे कर्मचार्यांचा संरक्षा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

कर्तव्यादरम्यान दरम्यान त्यांनी दाखवलेली सतर्कता, मागील महिन्यांत ट्रेन ऑपरेशन्समध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यात त्यांनी दिलेले योगदान, अनुचित घटना टाळण्यात त्यांचे योगदान या बद्दल हे पुरस्कार देण्यात आले. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि रूपये २०००/- रोख असतात.

मुंबई विभाग-

१. कुर्ला कारशेडचे विभाग अभियंता गौतम कुमार यांनी दि. २७.०४.२०२४ रोजी वेळापत्रकानुसार टीआय तपासणी दरम्यान त्यांना एका युनिटमध्ये बोगीहेडस्टॉकला तीन बाजूंनी तडे गेल्याचे निदर्शनास आले. सी चॅनेल वेल्डिंगमध्ये भेगा पडल्याने मोठ्या दुरुस्तीसाठी कोच मध्ये बिघाड होता.

 

२. चंद्रशेखर यांनी दि. १३.०५.२०२४ रोजी काम करत असताना किमी 18/647-18/649 वर रेल्वे तडा झाल्याचे निदर्शनास आले आणि तत्काळ कारवाईसाठी एस अँड टी नियंत्रक व विभाग अभियंता यांना कळवले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनुचित प्रकार टळला.

भुसावळ विभाग-

३. श्री खुशाल दत्तूजी, बडनेरा यांना दि. ०६.०५.२०२४ रोजी बडनेरा यार्डात ड्युटीवर असताना गाडी क्र.एमसीएम/सी अँड डब्ल्यू,च्या वॅगनमध्ये हॉट अॅक्सेल दिसला. एमएफएसजी/बॉक्सएन/एल आणि तात्काळ आवश्यक ती कारवाई केली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

४. भावना अमोल गजभिये, टेक्निशियन-2, बडनेरा दि. १५.०५.२०२४ रोजी बडनेरा स्थानकात गाडी क्रमांक एमएफएसजी/एलडीच्या वॅगनमध्ये बेअरिंग कपला तडा गेलेला दिसला आणि ग्रीस गळत असल्याचे त्यांना दिसले. ती वॅगन ट्रेनपासून वेगळी करण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळण्यास मदत झाली.

५. संदीप शामराव वानखेडे, ट्रॅक मेंटेनर, बोरगाव, दि. २५.०४.२०२४ रोजी त्यांना ट्रेन टीपीएचएसमध्ये हॉट अॅक्सल दिसल्याने त्यांनी तात्काळ स्टेशन मॅनेजर बोरगाव यांना माहिती दिली. त्यानंतर वॅगन वेगळी करण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

६. श्री सिद्धार्थ भिका तायडे, कीमन/इंजिनीअरिंग, माना, दि. १६.०५.२०२४ रोजी अप रोड किमी 645/25-27 वर कुराम-माना सेक्शनदरम्यान रेल्वे रूळाला तडा गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ट्रॅकचे रक्षण करून संबंधितांना याची माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

नागपूर विभाग-

७. शिवदयाळ देवराव कापसे, टेक्निशियन-२/सी अँड डब्ल्यू, आमला येथे दि. ०८.०४.२०२४ रोजी आमला स्थानकात गाडी क्रमांक एनबॉक्स/ई च्या रोलिंग-इन चाचणीदरम्यान एका वॅगनच्या चाकाच्या एक्सल बॉक्सचा बेअरिंग कप तुटलेला आढळला आणि त्यात गरम अॅक्सलही आढळून आले. ती वॅगन खराब आणि व्हील रिप्लेसमेंटसाठी लोडपासून अलिप्त असल्याचे चिन्हांकित केले गेले. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

८. शिवेश के. मीणा, सहाय्यक लोको पायलट, नागपूर दि. ०१.०४.२०२४ रोजी गाडी क्रमांक 12721 वर काम करत असताना मुलताई स्थानकात लोकोच्या एका चाकात प्रायमरी सस्पेंशन डम्पर टॉप उजव्या बाजूचे फिक्सिंग बोल्ट तुटलेले आढळले. आमला येथे लोको बदलण्यात आला. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.

पुणे विभाग-

९. श्री कप्तान सिंह, कीमन ट्रॅक मेंटेनर, भिलवडी येथे दि. २६.०५.२०२४ रोजी त्यांना ट्रेन क्र.वर तुटलेले हँडल लटकलेले दिसले. जेएसडब्ल्यूडी आणि तत्काळ जीपीएसद्वारे इंजिनीअरिंग कंट्रोलला माहिती दिली. स्टेशन मास्तर शिंदवणे यांनी याला दुजोरा दिला असून गाडी कराड स्थानकात दाखल झाल्याने संभाव्य दुर्घटना टळली.

१०. अजयकुमार मोडक, सहाय्यक स्टेशन मॅनेजर, लोणी येथे दि. २१.०२.२०२४ रोजी गाडी क्रमांक 11301 सोबत हँड सिग्नलची देवाणघेवाण करत असताना कोच ए/2 मध्ये गंभीर ब्रेक बाइंडिंग आढळून आले. त्यांनी तात्काळ धोक्याचा सिग्नल दाखवून लोको पायलटला परिस्थितीची माहिती दिली. उरुळी ते लोणी दरम्यान गाडी थांबवून ब्रेक बाइंडिंग दुरुस्त करण्यात आले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनुचित प्रकार टळला.

सोलापूर विभाग-

११. संतोष गाडेप्पा खंदारे, ट्रॅक मेंटेनर, बोरोटी यांना दि. ०४.०५.२०२४ रोजी डीयूडी-बीओटी विभागातील येथे गाडी क्र.केएम 508/9-10च्या वॅगनच्या चाकाला आग लागल्याचे निदर्शनास आले. अप बीजीके आणि ड्युटीवर असलेल्या स्टेशन मॅनेजर / बीओटीला माहिती दिली आणि बीओटी स्टेशनवर तपासणी दरम्यान हॉट एक्सल आढळले. त्यांची सजगता आणि कामाप्रती असलेली निष्ठा यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.

महाव्यवस्थापकांनी आपल्या भाषणात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कर्तव्याप्रती सतर्कता आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, अशा सतर्कता आणि शौर्याने इतरांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.

यावेळी अतिरिक्त महाव्यवस्थापक चित्तरंजन स्वैन, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी एम. एस. उप्पल, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक एस. एस. गुप्ता, प्रधान मुख्य अभियंता रजनीश माथुर, प्रधान मुख्य यांत्रिकी अभियंता सुनील कुमार, प्रधान मुख्य विद्युत अभियंता एन. पी. सिंह, प्रधान मुख्य सिग्नल धर्मवीर मीणा उपस्थित होते.

 

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!