नाशिक शहर
वाचा काय म्हणाले माजी खासदार हेमंत गोडसे
खासदार हेमंत गोडसे यांनी मानले मतदारांसह महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार जनतेने दिलेला कौलही मान्य

मी श्री हेमंत तुकाराम गोडसे
महायुताचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनतीने आणि प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांचा मी ऋणी आहे. संपूर्ण राज्य भरात एकंदरीत महाविकास आघाडीकडे कौल असल्याच दिसून येत असून जनतेने दिलेल्या कौल आपण मोठ्या मनाने आणि सन्मानाने मान्य करून जनतेसाठी आपण यापुढे देखील तत्पर राहणार. गेल्या १० वर्षांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करत असताना विविध विकासकाम करण्याची संधी प्राप्त झाली. आपल्या कार्यकाळात अनेक मोठे प्रकल्प मंजूर झाले असून ते येत्या काळात नक्कीच कार्यान्वित होईल अशी मी विजयी उमेदवाराकडून अपेक्षा ठेवतो आणि नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील अशी आशा देखील बाळगतो व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देतो.
श्री हेमंत तुकाराम गोडसे
