नाशिक ग्रामीणनाशिकचे राजकारण

शिक्षक आमदार,काम दमदार,प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार

मुख्यमंत्र्यांसमवेत सकारात्मक चर्चा


वेगवान नाशिक/Nashik/नाशिक,अविनाश पारखे,मनमाड,नांदगाव,दि.3 मे –

मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिक्षक आमदार किशोर दराडे व सर्व संघटना यांनी घडवून आणलेली शिक्षक संबंधी प्रश्नांची बैठक यशस्वी पार पडली असल्याचे समजते.

आजच्या बैठकीला मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर,कृषीमंत्री दादासाहेब भुसे,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,उद्योगमंत्री उदय सामंत व गृहराज्य व शालेय शिक्षणराज्य मंत्री शुंभराजे देसाई यांच्यासह नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे,मुख्याध्यापक संघ व टीडीएफ पदाधिकारी उपस्थित होते.

सन 2005 पूर्वी नियुक्त पण 100% अनुदान 2005 नंतर लागु झालेल्या कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्णपणे सकारात्मक असून आचारसंहिता संपताच काही दिवसात हा प्रश्न निकाली लागणार असल्याचे सुतोवाच केले.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

20%,40% अनुदान टप्पा वाढ ही नैसर्गिक पद्धतीने नियमितपणे देण्याचे मान्य केले तसेच आदिवासी आश्रम शाळेचे पगार नियमित व कामकाजाची वेळ जून पासून 11 ते 5 करणार, विनाअनुदानितवरुन अनुदानितवर बदली व मान्यता आणि शालार्थ आयडी प्रक्रिया ऑनलाइन करणार,आश्रम शाळेचा ग्रेड पे सातव्या वेतन आयोगानुसार 4400 वरुन 4800 वर करण्याचे परिपत्रक आजच निर्गमित करणार, सर्व अनुदानित शाळा व आश्रम शाळांना कला व क्रीड़ा शिक्षकांची पदे भरण्यास त्वरित मान्य केले, 7व्या वेतन आयोग नुसार वेतनेत्तर अनुदान देण्यास मुख्यमंत्री अनुकूल असल्याचे समजते.

यावेळी टीडीएफ चे नाशिक विभाग कोषाध्यक्ष मोहन चकोर,नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी.देशमुख जुनी पेन्शन नेते दिगंबर नारायणे,अशोकराव सोमवंशी, अमरावती विभागाच्या संगीता शिंदे,महेंद्र हिंगे, उपाध्यक्ष,प्रदीप सांगळे,बी.के.नागरे,दिनेश देवरे,माधुरी मेटेंगे,बंडू मखरे,सुदर्शनाताई त्रिगुणाईत,संभाजी पाटील, नाशिक,नगर, जळगाव,धुळे,नंदुरबार आदी जिल्ह्यातील नाशिक विभागातून मोठ्या प्रमाणात  मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.

बहुप्रतीक्षित आचारसंहिता संपल्यावर कर्मचारी हिताचे निर्णय होणार असल्याने या बैठकीस महत्व आले होते.

आता प्रत्यक्षात आचारसंहिता संपल्यानंतर मंत्रिमंडळापुढे हे सर्व निर्णय लागू करणे संदर्भात कशी प्रक्रिया राबविली जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.कारण लागलीच विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने कर्मचारी हिताचे निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा हा प्रयत्न आणि ही संधी कोणी सोडेल अशी शक्यता नाही.


अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!