नाशिक जिल्ह्यात यंदा पाऊस धूमाकूळ घालणार! पण पावसाचा एवढा खंडही पडणार
नाशिक जिल्ह्यात यंदा पाऊस धूमाकूळ घालणार! पण पावसाचा एवढा खंडही पडणार
वेगवान नाशिक
पुणे : नाशिक जिल्ह्याने यंदा प्रचंड दुष्काळ पाहिला आहे. दुष्काळामुळे शेतक-यांचे पैसे शिल्लक नाही. पिण्यासाठी पाणी नाही. जनावारांचा चारा नाही. यंदा नाशिक जिल्ह्यात पाऊस धूमाकूळ घालणार असला तरी पाऊस दोन महिने खंड देणार आहे. नाशिक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला पाऊस ओढ देणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कसे राहणार आहे. घ्या जाणून
राष्ट्रवादी फोडून अजित पवारांनी चूक केली का. बायकोही पराभूत होणार, अजित पवार रडणार की लढणार पहा वेगवान मराठी विशेष
राज्यामध्ये जून ते सप्टेंबर २०२४ दरम्यान सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, नाशिक, चंद्रपूर या भागांत १०० टक्के आणि उर्वरित भागांत साधारणपणे ९५ ते ९८ टक्के पावसाचा अंदाज आहे. पुण्यात शंभर टक्के पावसाचे प्रमाण असेल, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला. जून-जुलै महिन्यात पावसाचा खंड पडेल आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल, असेही त्यांनी सांगितले.
मध्य रेल्वेच्या या प्रवासी गाड्यांच्या वेळेत बदल
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होणार
सध्या कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड पडतील, असे हवामान राहणार आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील. जून-जुलै महिन्यात पाऊस ओढ देणार आहे.
या भागात पडणार खंड !
वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात धुळे, राहुरी, अकोला, पाडेगाव, शिंदेवाही, पुणे, कोल्हापूर येथे पावसात मोठा खंड राहण्याची शक्यता असून, दापोली, नागपूर, निफाड, सोलापूर, जळगाव व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे.
दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात
दोन दिवसांपासून केरळमध्ये मान्सूनचा मुक्काम होता, तो आता पुढे सरकला आहे. रविवारी मान्सूनने तामिळनाडू, कर्नाटकचा काही भाग, आंध्र प्रदेशचा काही भाग आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये शिरकाव केला आहे.
येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. तसेच राज्यातील विदर्भामधील तापमान किंचित कमी झाले असून, अनेक भागांत पावसाचा अंदाज दिला आहे.
यंदा वेळेआधीच मान्सून दाखल झाला. केरळमध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल झालेला मान्सून पुढे सरकला नव्हता. रविवारी मान्सूनने मोठी वाटचाल केली आहे. बराच भाग त्याने व्यापला असून, त्याचा पुढील प्रवासही वेगाने होईल.