सरकारी माहिती
अबब्…भुसावळ विभागाने एका महिन्यात मिळवला इतका महसुल
भुसावळ विभागाने मे २०२४ मध्ये १३७ कोटी रुपयांचा उल्लेखनीय महसूल मिळवला
Wegwan nashik/वेगवान नाशिक- ५ जून:-
भुसावळ विभागाने मे २०२४ मध्ये महसुलाचे विविध क्षेत्रात लक्षणीय वाढ साधून असाधारणपणे चांगली कामगिरी केली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, विभागाला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसा मिळाली आहे.
मध्य रेल्वेच्या या प्रवासी गाड्यांच्या वेळेत बदल
प्रवासी महसुलाच्या बाबतीत, भुसावळ विभागाला मे २०२४ मध्ये ७५.९४ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. या यशात तिकीट तपासणीने महत्त्वपूर्ण योगदान दिले असून एकूण ९६ हजार केसेस द्वारे ७.८२ कोटी रुपयांच्या महसुल प्राप्त झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, व्हिडीओ
विविध कोचिंग मधून मिळणाऱ्या महसुलातही लक्षणीय वाढ झाली असून, ती रु. ०६.०६ कोटींवर पोहोचली आहे. विविध सेवा देण्याच्या विभागाच्या वचनबद्धतेमुळे माल वाहतुकीद्वारे ४९.३२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. मालगाड्यांनी मोटारगाड्या, पेट्रोलियम उत्पादने, कांदे, अन्नधान्य आणि सिमेंट वॅगनसह विविध प्रकारच्या मालाची कुशलतेने वाहतूक केली आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदा पाऊस धूमाकूळ घालणार! पण पावसाचा एवढा खंडही पडणार
पार्सल सेवेने एकूण ०३.२६ कोटी रुपयांचा महसूल मिळवला, जे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यात भुसावळ मंडळाची बहुमुखी प्रतिभा दर्शवते. या व्यतिरिक्त, इतर विविध व्यावसायिक क्रियाकलापांमधून विविध महसूल रु. २.७० कोटी आहे ज्यामुळे विभागाच्या आर्थिक यशात आणखी भर पडली. एकंदरीत, भुसावळ विभागाने मे २०२४ मध्ये १३७ कोटी रुपयांची उल्लेखनीय महसुल मिळवला आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदा पाऊस धूमाकूळ घालणार! पण पावसाचा एवढा खंडही पडणार