बागलाणः लखमापूर येथे दुचाकीस्वाराच्या पाठीत चोरट्यांनी घातले दांडके

वेगवान नाशिक / आप्पा जगताप
सटाणा, ता. 2 जुन 2024 –
तालुक्यातील लखमापूर या गावी कामदे मळा या परिसरात शुक्रवार (ता.३१) वेळ रात्री साडे आठच्या सुमारास जबरी चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली असुन, या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकरा किलो गांजा जप्त…अंबड एमआयडीसी पोलिसांची गरवारे पॉइंट येथे कारवाई
याबाबत,पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सटाणा तालुक्यातील लखमापूर या गावी कामदे मळा परिसरात वरील तारीख व वेळी फिर्यादी व साक्षीदार दिनकर नामदेव बच्छाव (वय ४५ वर्ष) हे मोटरसायकलने घरी जात असताना, मोतीराम कृष्णा पवार यांच्या शेताजवळ जबरी चोरीच्या इराद्याने रस्त्याच्या कडेस ऊभे असलेल्या संशयित आरोपींनी फिर्यादीच्या पाठीत जोरात लाकडी दांडक्याने प्रहार केल्याने फिर्यादी साक्षीदार हे मोटरसायकलसह नाल्यात पडले.
सिडकोत लंके समर्थकांकडून निकालापूर्वीच बॅनरबाजी
त्यांच्या सोबतीस असलेल्या तीन अनोळखी आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना लाडकी दांडक्याच्या साहाय्याने पाठीवर जबर मारहाण करून दुखापत केली त्याच दरम्यान फिर्यादी जवळ असलेल्या पैशाची बॅग हिसकावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
गाडी चोरांचा सुळसुळाट.. चोर सीसीटीव्ही मध्ये कैद…
त्याप्रकरणी ,फिर्यादी यांनी सदर घटनेची माहिती सटाणा पोलिसात दिली असता संशयित अनोळखी आरोपींविरुद्ध भांदवी कलम ३९३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पो.ऊ.नी अनिल भारती करत आहे.
