नाशिकचे राजकारण

सिडकोत लंके समर्थकांकडून निकालापूर्वीच बॅनरबाजी

सिडकोत लंके समर्थकांकडून निकालापूर्वीच बॅनरबाजी


वेगवान नाशिक/ नाशिक:, नितीन चव्हाण ता:,२जून २०२४

महाविकास आघाडीचे (अहिल्यानंगर) दक्षिणचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थकांकडून नाशिक शहरासह सिडकोतील त्रिमूर्ती चौक, लेखानगर, पाथर्डी फाटा शुभम पार्क, उत्तमनगर, पवननगर यासह विविध भागत ठिकठिकाणी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच समर्थकांनी लंके यांचा विजय निश्चित असल्याबाबतचे बॅनर्स लंके यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

या बॅनर्सवर “अपराजित संघर्ष योद्धा” जनता जनार्दन माझ्या पाठीशी, मग काय कुणाची भीती, “राज तिलक की तयारी करो” असे स्लोगन टाकून थेट लंके यांचा एक प्रकारे विजय होणार असल्याने निलेश लंके यांना समर्थकांकडून बॅनरच्या माध्यमातून निकाल लागण्यापूर्वीच शुभेच्छा देण्यात आल्या आहे.

त्यामुळे नाशिक शहरासह सिडको परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या बॅनरबाजीची सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे.

निलेश लंके समर्थक सागर नागरे व त्यांच्या मित्र परिवाराने बॅनर बाजी केल्याचे समजते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!