नाशिक क्राईम

गाडी चोरांचा सुळसुळाट.. चोर सीसीटीव्ही मध्ये कैद…

गाडी चोरांचा सुळसुळाट.. चोर सीसीटीव्ही मध्ये कैद...


वेगवान नाशिक/ नाशिक:, नितीन चव्हाण ता :,१ जून २०२४

म्हररूळ पोलीस स्टेशन हद्दीत गाड्या चोरींचे सत्र सुरूच आहे.

अशीच एक गाडी चोरीची घटना भर दिवसा घडली आहे.
महेश पाटील, राहणार बळी मंदिर हे एका कंपनीत एम आर म्हणून काम करतात.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

हे म्हसरूळ भागात त्यांच्या रोजच्या दैनंदिन कामानिमित्त गेले त्यांना एका डॉक्टरांचा कॉल आल्याने तो कॉल अटेंड करण्यासाठी महेश पाटील यांनी पार्किंग मध्ये गाडी पार्क केली.

पंधरा ते वीस मिनिटानंतर त्यांचे काम आटपून ते खाली आले असता त्यांनी त्यांच्या गाडीची शोधाशोध केली परंतु त्यांना गाडी आढळून आली नाही.

त्यांनी आसपासचा सीसीटीव्ही चेक केला असता त्यामध्ये एका अज्ञात इसमाने त्यांची होंडा कंपनीची युनिकॉर्न गाडी क्रमांक एमएच १९. डी पी.२३९१
चोरून नेल्याचे निदर्शनात आले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!