गिरणा नदीत तरुण बुडाला ; अंधार पडल्याने शोधकार्य थांबले

देवळा : तालुक्यातील भऊर येथील गिरणा नदी पात्रात भऊर – खामखेडा नदीला जोडणाऱ्या पुलाजवळ अंदाजे २० वर्षीय तरुण नदीत बुडाला असून, स्थानिकांच्या मदतीने सव्वाचार वाजेपासून सुरू असलेले मदतकार्य अंधार पडल्याने थांबविण्यात आले.
लालपरिच्या सेवेने केली इतकी वर्ष पूर्ण
जवळ उभ्या असलेल्या त्याच्या नातलगांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केली. खामखेडा गावातील एका व्यक्तीने ही घटना पाहताच त्यांनी सरपंच वैभव पवार यांना फोन केला. पवार यांनी लागलीच गावातील पोहणारे तरुण घेऊन नदी गाठली. पोलीस व महसूल प्रशासनाला फोन करून घटनेची माहिती दिली व स्थानिकांच्या मदतीने पवार यांनी मदतकार्य सुरू केले. गावातील अनेक तरुणांनी प्रयत्न करून देखील त्यात यश न आल्याने वसाका येथील पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्तीला सरपंच पवार यांनी बोलविले. मात्र, पाण्याची पातळी खोल असल्याने सायंकाळी ७ वाजेपर्यंत तरुणाचा शोध लागला नाही. अंधार झाल्याने ही शोधमोहीम थांबविण्यात आली.
लोकसभेच्या निकालाच्या आगोदर गॅस खुपचं झाला स्वस्त LPG Cylinder Prices
देवळा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार सिन्नर येथील स्कुबा ड्रायव्हिंग, सायखेडा, मालेगाव येथील पथकाशी संपर्क केला असून, उद्या पुढील शोध मोहीम सुरू करण्यात येणार असल्याने त्यांनी सांगितले.
देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहा. पोलीस उप निरीक्षक विनय देवरे व त्यांची टीम घटनास्थळी लक्ष ठेऊन होती. मंडळ अधिकारी मनोहर गांगुर्डे हे देखील घटनास्थळी उपस्थित होते.
जिओ एयरटेल पेक्षा BSNL चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, तो ही 150 दिवसांची मुदतीत
सरपंच पवार यांच्यामुळे पुढील अनर्थ टाळला…..घटना घडतात खामखेड्याचे सरपंच वैभव पवार घटनास्थळी पोहचले, तोपर्यंत नदीत बुडालेल्या तरुणाचे नातलग नदीजवळ आले असता त्यांनी नदीच्या दिशेने धाव घेतली. यावेळी सरपंच पवार यांनी समयसूचकता दाखवत सर्वांना बाजूला करत समजूत घातल्याने मोठा अनर्थ टळला.

गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.