कंपनीचा पत्रा उचकटून…. चोरट्यांनी मारला पावणे सहा लाखांचा डल्ला
कंपनीचा पत्रा उचकटून.... चोरट्यांनी मारला पावणे सहा लाखांचा डल्ला
वेगवान नाशिक /नाशिक, नितीन चव्हाण ता:,३१ मे २०२४
अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या शटरच्या बाजूचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी कंपनीत असलेली सुमारे पावणेसहा लाख रुपये किमतीच्या कॉपर वायर असलेल्या बॉबिन चोरून नेल्याची घटना घडलीआहे
याबाबत अंबड एमआयडीसी पोलिसांमी दिलेली माहिती अशी की अंबड औद्योगिक वसाहतीत इलेक्ट्रिक वायर व केबल तयार करण्याची फिर्यादी वैभव भास्कर कापडणे (रा.वासननगर,
पाथर्डी फाटा) यांची पॉवर कँब इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे
आहे.
दि. २८ ते २९ मे च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या कंपनीच्या शटरच्या बाजूचा पत्रा कशाच्या तरी सहाय्याने उचकाटून कंपनीमध्ये प्रवेश केला.
यावेळी अज्ञात चोरट्यांनी कंपनीत असलेल्या ५ लाख ८० हजार १२५ रुपये किंमतीच्या व ५५२.५ किलोग्रॅम वजनाच्या सुमारे साडे तीन किलो वजनाच्या १७० बॉबिन घरफोडी करून चोरून नेल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी कंपनी मालक वैभव कापडणे हे नेहमीप्रमाणे कंपनीत आले असता त्यांच्या कंपनीत चोरी झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली.
त्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.