नाशिक ग्रामीण

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची जोपासना करावी – मंत्री छगन भुजबळ

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची जोपासना करावी - मंत्री छगन भुजबळ


 

वेगवान /नाशिक /एकनाथ भालेराव

येवला,दि.३१ मे 2024,एक कर्तृत्ववान, न्यायी व मुत्सद्दी राज्यकर्त्या म्हणून आपल्या कामाचा अमीट ठसा संपूर्ण भारतीयांवर उमटविला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी फक्त राज्यकारभार न करता आपल्या कारकीर्दीत त्यांनी सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या विचारांची जोपासना सर्वांनी करावी असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला अंगणगाव येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर घाट येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

यावेळी येवला बाजार समितीचे सभापती किसनकाका धनगे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, गणपत कांदळकर, मोहन शेलार, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, परमानंद जाधव, बबनराव साळवे, सुंदरलाल रोकडे, सचिन सोनवणे, सुमित थोरात, दत्तू देवरे, दत्तू वैद्य, जानकीराम खांडेकर, विश्वास देवरे, विजय खैरनार, नितीन गायकवाड, मलिक मेंबर, राकेश कुंभारे, योगेश तक्ते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जनहिताला प्राधान्य देत देशभर समाजकार्याचा ठसा देखील उमटवला. आपल्या कर्तृत्वातून इतिहासात त्या अजरामर झालेल्या आहे. संपूर्ण हिंदुस्थानात त्यांनी धार्मिक स्थळांची निर्मिती केली. त्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात त्यांचं नाव आहे. त्यांनी नाशिकला कुशावर्त कुंड, गोदा काठावरील मंदिर, सप्तशृंगी गडावर कुंड, चांदवड येथील रेणुका मंदिर, होळकर वाडे यासह विविध वास्तूंची उभारणी केली. त्यांनी धार्मिक कार्यक्रमांसोबत प्रसंगी तलवार देखील हातात घेतली. त्यामुळे देशाच्या इतिहासात त्यांचं स्थान अतिशय महत्वाचं असून त्याच्या इतिहासाचा सर्वांनी अभ्यास करावा तसेच त्यांचे विचार जोपासायला हवे असे आवाहन त्यांनी केले.

येवला येथील कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त येवला संपर्क कार्यालय येथे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!