नाशिक क्राईम

केक भरवण्याच्या शुल्लक कारणावरून… मित्रांनीच केला मित्राचा शेवट…!

केक भरवण्याच्या शुल्लक कारणावरून... मित्रांनीच केला मित्राचा शेवट...!


वेगवान नाशिक/ नाशिक नितीन चव्हाण, ता:,३१मे २०२४

नाशिक शहरात गेल्या काही दिवसापासून खुणाचे सत्र सुरूच आहे. गाडीच्या काचा फोडणे, अपहरण करणे, तसेच टवाळखोरांचा उद्रेकही गेल्या काही कमी होताना दिसत नाहीये.

त्यातच नाशिकमध्ये पुन्हा
17 वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पंचवटीतील पेठरोड कर्नल नगर येथील रहिवासी असणाऱ्या आशिष रणमाळेची गुरुवारी (30 मे 2024) रात्री हत्या करण्यात आली.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

आशिष रणमाळे हा 17 वर्षांचा होता. धक्कादायक बाब म्हणजे आशिषच्याच जवळच्या मित्रांनी त्याची हत्या केल्याचे म्हटले जात आहे.

दोन दिवसांपूर्वीच मित्राच्या वाढदिवशी एकमेकांना केक भरवण्याच्या किरकोळ कारणावरून आशिषचे भांडण झाले होते.

हाच राग मनात ठेवून तीन अल्पवयीन मित्रांनी धारदार हत्याराने आशिषची हत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणाची अधिक तपास पंचवटी पोलीस करत आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!