नाशिक शहर

अनाधिकृत पणे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर सिडको मनपाची कारवाई…

अनाधिकृत पणे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर सिडको मनपाची कारवाई...


वेगवान नाशिक/ नाशिक नितीन चव्हाण, ता:,३१मे २०२४

मनपा सिडको विभागीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने अतिक्रमण मोहीम सुरूच आहे.

सिंबोसिस स्टेडियम त्रिमूर्ती चौक पाथर्डी फाटा गोविंद नगर या ठिकाणी आज मोहीम राबवण्यात आली.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

या मोहिमे दरम्यान अनधिकृतपणे रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.

यामध्ये वजन काटा अनधिकृत होल्डिंग स्टॅन्ड बोर्ड जाहिरात बोर्ड टेबल खुर्ची तसेच बाकडेही जमा करण्यात आले आहे.

अतिक्रमण करतेवेळी अनाधिकृत विक्रेत्यांना अनेक वेळा नोटीस बजवूनही रस्त्याच्या कडेला कुठलीही परवानगी न घेता सर्रासपणे अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर आज कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान अतिक्रमण प्रमुख प्रदीप जाधव, कर्मचारी सोमेश दिवे, रवींद्र कातवटे, वाहन चालक मंदार परांडे,निखिल तेजाळे, मिलिंद ढोले, उपस्थित होते. अनाधिकृतपणे अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई चालूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!