देशातील धार्मिक स्थळे, धर्मशाळा, घाट बांधण्यासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं योगदान अतिशय महत्वाचं – मंत्री छगन भुजबळ
देशातील धार्मिक स्थळे, धर्मशाळा, घाट बांधण्यासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं योगदान अतिशय महत्वाचं - मंत्री छगन भुजबळ
वेगवान /नाशिक /एकनाथ भालेराव
,येवला/दि.31 मे 2024….. देशभरातील मंदिरे, धार्मिक स्थळे, विहिरी, घाट, धर्मशाळा यासह विविध महत्वपूर्ण ऐतिहासिक वास्तू साकारणामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अंदरसुल येथे भव्य मिरवणूक व प्रतिमा पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपस्थित नागरिकांकडून मंत्री छगन भुजबळ यांना काठी आणि घोंगडी देऊन त्यांचा सन्मान केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, बाजार समितीचे सभापती किसनकाका धनगे, सरपंच कविता कचरे, मकरंद सोनवणे, बबनराव साळवे, दिपक सेंद्रे, दत्तू देवरे,योगेश जहागीरदार, जगन पाटील, गोरख सेंद्रे, अमोल एंडाईत,प्रवीण जानराव, सचिन सोनवणे, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, सुमित थोरात, प्रमोद साळवे, नवनाथ सोनवणे, रवी सेंद्रे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, जनार्दन बागल, अमोल सोनवणे, नंदू जाधव, बाबासाहेब रोकडे, हरिभाऊ बागल, अंबादास सेंद्रे, सुदाम सोनवणे, महेश देशमुख, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मल्हारराव होळकर यांनी आपल्या शौर्याने इंग्रजांना जेरीस आणले. अतिशय कमी वयात निधन झाल्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी राजकारभार सांभाळला. देशभरात त्यांनी आपलं साम्राज्य वाढवल. देशाच्या इतिहासात त्यांचं अतिशय महत्वपूर्ण स्थान त्यांचं आहे. त्यांचा हा इतिहास सर्वांनी अभ्यासाला पाहिजे असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थितांना केले.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये