टाकाऊ वस्तूंपासून सौंदर्यीकरण करत वाहतूक बेट बनले सेल्फी पॉईंट
स्वच्छ व सुंदर देवळालीचा संदेश, छोटी झाडे, वेली व विद्युत रोषणाई ठरते लक्षवेधी
वेगवान नाशिक/ Wegwan Nashik-
देवळाली कॅम्प :
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने स्वच्छता मोहिमेदरम्यान जमा झालेले टायर व लोकसभेच्या निवडणुकी वेळी वापरण्यात आलेल्या साहित्य पासून कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयासमोर आरोग्य अधिक्षक अमान गुप्ता यांच्या संकल्पनेतून आकर्षक बेटाचे सौंदरीकरण करत या ठिकाणी सेल्फी पॉईंट विकसित करण्यात आला असून हे बेट परिसरात चर्चेचा विषय बनले आहे.
स्वच्छता सर्वेक्षण २०२३ मध्ये सहभाग नोदावितांना यावर्षी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. तर आता स्वच्छता सर्वेक्षण २०२४ साठी प्रशासन सज्ज झाले असून तरुण असलेले आरोग्य निरीक्षक अमन गुप्ता या अधिकाऱ्याने चांगलीच कंबर कसल्याचे चित्र देवळालीत पाहायला मिळत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचा आरोग्य विभाग सातत्याने काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात आहे. येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयासमोर असलेले वाहतूक बेट विकसित करताना छोटा धबधबा, स्वच्छ देवळाली सुंदर देवळाली चा संदेश देणारा फलक अडगळीत पडलेले टायर, बिनकामी लाकूड व लोखंड यापासून अत्यंत कमी खर्च करत हे बेट साकार केले आहे. यामध्ये अत्यंत कमी पाण्यावर जगणारी बोगनवेल,एरिका पाम, ग्रीन लॉन्स, टिकोमा व छोटे छोटे क्रिपर्स यामध्ये लावण्यात आले आहे. त्यास विद्युत रोषणाई करण्यात आल्याने येणारा जाणाऱ्यांचे या बेटाकडे लक्ष वेधले जात आहे. सकाळ व सांयकाळी या ठिकाणी खंडेराव टेकडीकडे जाणाऱ्या पर्यटकांची मोठी रेलचेल असते त्यांच्यासाठी हा नवा सेल्फी पॉईंट बनला आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांचे मार्गदर्शनाखाली व आरोग्य कमर्चाऱ्यांनी सहकार्याने हे बेट सेल्फी पॉइंट म्हणून विकसित करण्यात आले आहे
कोट :- येथील आकर्षक बेट सेल्फी पॉईंट म्हणून विकसित करताना अत्यंत कमी खर्च आला असून या धबधब्याच्या पाण्यामध्ये मासेही पाळण्यात येणार आहे. :- अमन गुप्ता,आरोग्य निरीक्षक