मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून धूळगाव व १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व दरसवाडी डोंगरगाव कालव्याची पाहणी
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून धूळगाव व १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व दरसवाडी डोंगरगाव कालव्याची पाहणी

वेगवान /नाशिक /एकनाथ भालेराव
येवला दि.३१ मे 2024/ राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज धुळगाव व १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याच्या अस्तरीकरण कामाची पाहणी केली. यावेळी असलेली कामे मिळेल पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.
यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, मकरंद सोनवणे, भगवान ठोंबरे, शाम गुंड, श्रावण ठोंबरे, सचिन सोनवणे, सुमित थोरात, राकेश कुंभारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
येवला तालुक्यातील धूळगाव व १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ७२.५९ कोटी रुपये खर्च करून साकारण्यात येत आहे. तसेच सुमारे २४२ कोटी रुपये खर्चातून पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम करण्यात येत आहे. या दोन्ही प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यात यावे अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये