शेती

शेतकरी पीक विम्या पासून वंचीत?

शेतकरी पीक विम्या पासून वंचीत?


वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला /दिनांक.30मे 2024

येवला तालुक्यात सतत दुष्काळी असणाऱ्या उत्तर पूर्व सह सर्वच ठिकाणी २०२३ च्या खरीप हंगामात पावसाअभावी सर्वच पिके नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
शासनाने दुष्काळ जाहीर करूनही पीक विम्याचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.

येवला तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून वरूनराजा अत्यंत कमी पडल्याने कोणतीच पिके हाती लागली नाहीत.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

 

काही पिकांची अवस्थाही अशी झाली की ती सोंगणीलाही महाग झाली. चाराटंचाईने पशुधन सांभाळणेही जिकरीचे झाले आहे,

पिण्याच्या पाण्यासाठी तर अनेकांना वर्षभर टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा स्थितीत शासनाच्या पथकाने पाहणी करून दुष्काळ जाहीर केला. यासाठी शेतकऱ्यांना अनेक सवलती जाहीर झाल्या.

केंद्र शासनाने दुष्काळ अनुदान म्हणून हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये प्रमाणे तीन हेक्टर मयदिपर्यंत शेतकऱ्यांना पैसे दिले. पण पिकांचे जे मोठे नुकसान झाले त्याच्या उत्पादन खर्चाचा विचार करता ही शेतकऱ्यांना मिळालेले हे पैसे पुरेसे नाहीत.
तरिही पीक विम्याचे पैसे मिळून येणाऱ्या खरीप हंगामासाठी मोठी मदत होईल, ही शेतकऱ्यांना आशा होती.

पण खरीप हंगाम तोंडावर आला असूनही पीक विम्याचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी निराश होऊन ठिकठिकाणी चौकशी करत आहे.
येवला तालुक्यातील काही महसूल मंडलात पंचवीस टक्के अग्रिम पैसे मिळाले पण पुढील पैसे मिळाले नाहीत. येवला तालुक्यातील अनेक महसूल मंडलात अनेक गावे आहेत. पीकविमा मोठा आधार ठरणार असल्याने संबंधित विभागाने लक्ष देऊन लाभ मिळवून देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!