नाशिक ग्रामीण

ठेवीदारांना मिळणार त्यांच्या ठेवी परत,सुरुवात आजपासून

आमदार कांदे यांचे प्रयत्न सफल


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड, नांदगाव,दि.30 मे-

युनियन बँक,मनमाड शाखेत झालेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यात मनमाड शहर व परिसरातील शेकडो नागरिक व शेतकरी बांधवांचे पैसे अडकले होते आणि तो घोटाळा आहे असे समजल्यावर सर्वच नागरिक व शेतकरी बांधव हवालदिल झाले होते.

अशा परिस्थितीत आमदार सुहास कांदे यांनी धाव घेत सर्वांना धीर दिला आणि बँक प्रशासनाला धारेवर धरले.इतकेच नाही तर स्वतः फिर्यादी होऊन बँकेच्या सर्वच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.मुख्यमंत्री महोदयांना सर्व विषय सांगितला. मुख्यमंत्री साहेबांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून प्रकरणाची दखल घ्यायला सांगितले.

अण्णांनी स्वतः पुणे येथे जाऊन बँकेच्या वरिष्ठांशी भेट घेतली.बँकेने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मनमाड येथे पाठवले आणि याचे फलित म्हणजे ज्या ज्या ग्राहकांचे पैसे अडकलेले आहेत त्यांचे सर्व प्रकरण निकाली लागण्याचे आश्वासन देत आज सात ग्राहकांना त्यांचे गुंतवणूक केलेले पैसे परत देण्यात आले.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

अत्यंत कमी कालावधीत शेकडो कोटी रुपयांचा मोठा घोटाळा आमदार सुहास कांदे यांच्या दमदार स्टाईल मुळे चार दिवसात सोडविण्यास सुरुवात झाली.याचा सर्व बँकेचे ग्राहक,नागरिक व शेतकरी बांधवांना आनंद झाला.

उपस्थित ग्राहकांनी आमदार सुहास कांदे यांचे आभार मानले.पैसे मिळणार की नाही? अशी परिस्थिती असताना आमदार कांदे यांनी अतिशय जबाबदारपणे भूमिका निभावली आणि आज सर्व ग्राहकांचे पैसे परत देण्याची सुरुवात झाली याचा आनंद उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर होता.

याप्रसंगी नंतर सुहास कांदे,युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान,भाजपा उपजिल्हा अध्यक्ष नितीन पांडे,आरपीआय ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ आहिरे, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे,गंगादादा त्रिभवन,माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, पिंटू शिरसाट,आमीन पटेल,पिंटू वाघ,युवासेना शहर अधिकारी योगेश इमले,आसिफ शेख,लाला नागरे, दिनेश घुगे,ललित रसाळ,बाबा पठाण, आसिफ शेख, प्रशांत दराडे,प्रमोद अहिरे,गुरू निकाळे,सचिन दरगुडे,कुणाल वैजापूरकर, निलेश व्यवहारे उपस्थित होते.


अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!