चुंचाळे पोलीसांची धडाकेबाज कामगीरी…. पंधरा लाख बारा हजाराची सुगंधीत तंबाखु जप्त …..
चुंचाळे पोलीसांची धडाकेबाज कामगीरी.... पंधरा लाख बारा हजाराची सुगंधीत तंबाखु जप्त .....
वेगवान नाशिक / नाशिक नितीन चव्हाण, ता :, ३०मे २०२४
मध्य प्रदेशातून मुंबईकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली सुमारे पंधरा लाख १२ हजार रुपये किमतीची सुगंधित तंबाखू घेऊन जाणारा आयशर पोलिसांनी जप्त केला.
दरम्यान एमआयडीसी पोलीस चौकी सुरु झाल्यानंतर एवढी मोठी कारवाई करण्यात आल्याने पोलिस आयुक्तांनी पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासह पोलिसांचे कौतुक केले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील इंदूर एका ट्रकमधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखू मुंबईकडे जाणणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार एम.आय.डी.सी. चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस नाईक समाधान चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोय पथकाने मुंबई महामार्गावरील अंबड एमआयडीसीनजीक असलेल्या गरवारे पॉइंट येथून या ठिकाणी सापळा लावला होता.
बुधवारी (दि. २९) पहाटे ०२.५५ वा. एक संशयित आपशर ट्रक क्रमांक सीजी ०४ एन डब्ल्यू ९०७६ मिळुनआला, नमूद आयशर ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखू मिळून आली.
सुगंधी तंबाखूबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न
सुरक्षा अधिकारी पी. एस. पाटील
यांना माहिती दिली असता त्यांनी सदर मुद्देमालाची पाहणी करून एकूण १५,१२,००० रु. विमतीची मिराज कौर कोकील छाप तंबाखूचे एकूण
१८० बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये ४२ पाऊच दोन इसमान सह पंचनामा करून ताब्यात घेतले.
तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखूची विक्रीसाठी वाहतूक करणारे संशयित इसम सीताराम अमजा मकवाणी (वय ४६ वर्षे, राहगारवर्ड नं.१९ खरगोन, आशापुरा, मध्य प्रदेश) बबलू धनसिंग मकवाणी (वय १९ वर्षे, राठी, गीगाम, मेस्वार थाना, खरगोन, आशापुरा, मध्य प्रदेश) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी पी. एम. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.