कोरोनात वडिलांचे छत्र हरपले… आईने शिवण काम सुरु केले… सृजन ने दहवीत मिळवले ९७. ८०%
कोरोनात वडिलांचे छत्र हरपले... आईने शिवण काम सुरु केले... सृजन ने दहवीत मिळवले ९७. ८०%
वेगवान नाशिक / नाशिक नितीन चव्हाण, ता :, ३०मे २०२४
वडीलांचे करोना काळात निधन झाले. त्यानंतर अतिशय कठीण परिस्तिथी मध्ये आई ने स्वतःला सावरत आपल्या दोघंही मुलांना शिवणकाम करून वाढविले.
या चालू 2024 वर्षाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत सृजन कैलास पवार या विद्यार्थ्यांने नाशिकच्या विखे पाटील या शाळेत 97.80% मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला.
तसेच नाशिक शहर व जिल्ह्य़ात देखील सृजन ने द्वितीय क्रमांकावर आपले नाव स्थापित केले आहे.
सृजन पवार च्या या यशा मागे त्याची आई खंबीरपणे उभी होती म्हणुनच सृजन मेहनत घेऊन ही मजल मारू शकला असे सृजन ने सांगितले.
सृजन च्या या यशाबद्दल विखे पाटील शाळेतील शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, व्यवस्थापन समितीचे असणारे सहकार्य व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तसेच आई, मामा, काका-काकू यांचे अथक परिश्रम या सर्वांचीच सांगड आहे.
सृजन पवार चे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, परिसरातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षांव होत आहे.