नाशिक ग्रामीण

बागलाण तालुक्यात पत्नीने केला पतीचा खून


वेगवान नाशिक / अरुण थोरे

सटाणा, ता. 29 में 2024 –

बागलाण तालुक्यातील अंबासन येथील एका मेंढपाळ महिलेने आपल्या दारुड्या पतीला कंटाळून पतीचा खून केल्याची घटना घडली २७ मे रोजी रात्री च्या सुमारास घडली आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

याबाबत जायखेडा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, संतोष म्हाळु अहिरे (सध्या राहणार अंबासन ता. सटाणा जि. नाशिक) हा आपल्या पत्नीसोबत मेंढपाळ व्यवसाय करत होता.

धक्कादायक ….नगर पालिकेचे काम चालू असताना फुटली गॅस लाईन परिसरात एकच धावपळ

ते घटनेच्या दिवशी दोधा विठ्ठल सावंत (रा. अंबासन) यांच्या शेतात असताना संतोष अहिरे यांनी आपल्या पत्नीला दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात पत्नीने धारदार वस्तूने डोक्यात मारल्याने पतीचा मृत्यू झाला.

पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालवा स्वप्नपूर्तीची उत्कंठा शिगेला…

याबाबत मयताचा भाऊ नागू म्हाळु अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयपीसी 302 अंतर्गत खुणाचा गुन्हा दाखल झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ करत आहेत.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!