नाशिक क्राईम

सिडकोतील सराफास बंटी,बबलीने एवढ्या लाखांचा घातला गंडा

सिडकोतील सराफास बंटी,बबलीने एवढ्या लाखांचा घातला गंडा


वेगवान नाशिक / नाशिक नितीन चव्हाण, ता :,२९मे २०२४

सराफी दुकानातून सोन्याचे दागिने घेऊन पैसे दिल्याचा बनाव करून एका महिलेसह पुरुषाने दुकानदाराची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सिडकोत घडला.

याबाबत नितीन विष्णू सराफ (वय ४२, रा. सिडको, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी राहुल सोनवणे ऊर्फ अजय वाघ व नमिता मोंडल या दोघांनी संगनमत करून दि. १२ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास संदीप सोनवणे सिडकोतील दत्त चौकात असलेल्या न्यू कलावती अलंकार या शॉपमधून व फिर्यादी नितीन सराफ यांच्या सराफी ज्वेलर्समधून दि. २२ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अनुक्रमे १ लाख ८५ हजार ८५० व १ लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने खरेदी केले.

हे सोन्याचे दागिने घेऊन पैसे दिल्याचा बनाव करून पाच हजार रुपये एक्स्ट्रा ट्रान्स्फर झाल्याची बतावणी करीत ते पाच हजार रुपये परत पयाची फसवणूक
घेतले.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

आरोपी राहुल सोनवणे व नमिता मोंडल यांनी अशा प्रकारे फिर्यादी नितीन सराफ व साक्षीदार संदीप सोनवणे यांची ३ लाख ५० हजार ५८० रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात महिलेसह पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!