पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालवा स्वप्नपूर्तीची उत्कंठा शिगेला…
पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालवा स्वप्नपूर्तीची उत्कंठा शिगेला... स्वप्नपूर्ती साठी आता पावसाची प्रतिक्षा.

वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
येवला, ता. 29 मे 2024 – ५२ वर्षापासून पाण्याची प्रतीक्षा करत असलेला ओसाड कालवा आणि ५२ वर्षानंतर उत्तर पूर्व भागातील शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची उत्कंठा आता नजरेच्या अंतरावर दिसत आहे.
मागील वर्षी मा ना छगन भुजबळ यांचे माध्यमातून २४२ कोटी रुपये चे विस्तारीकरण, अस्तरीकरण काम मंजूर झाले आणि ऑक्टोबर मध्ये कामाचा कार्यारंभ आदेश देखील झाला.
निविदा प्रक्रियेत २ वर्ष कामाची मुदत असताना मा ना छगन भुजबळ यांनी सतत बैठका घेत,संबधित कामाची प्रत्यक्ष पाहणी करत जास्तीत जास्त यंत्र समुग्रीचा वापर करण्याच्या सूचना करत १५ जून २०२४ पर्यंत पूनेगावं ते दरसवाडी आणि दरसवाडी ते डोंगरगाव ही दोन्ही कामे पूर्ण करा अश्या सूचना संबधित अधिकारी आणि ठेकेदार यांना केल्या होत्या.
मा ना छगन भुजबळ यांच्या आदेशाप्रमाणे आजमितीस काम अंतिम टप्प्यात असून राहिलेले किरकोळ काम १५ जून च्या आत पूर्ण होणार आहे.
भारतीय अर्थसंकल्पात हे क्षेत्र असावे केंद्रस्थानी
पुनेगाव ते दरसवाडी या ६३ किमी मध्ये केवळ १५ किमी मातीकाम बाकी आहे . त्यासाठी २९ पोकलंड मशीन काम करत आहेत.तर काँक्रीटीकरण ३८ किमी बाकी असून येथे एकाचवेळी ४ ठिकाणी काँक्रीटीकरण काम सुरू आहे.
१५ जून पर्यंत मातीकाम तर १५ जुलै पर्यंत काँक्रीटीकरणचे सर्व काम पूर्ण करण्याचे संबधित यंत्रणेचे उद्दिष्ट आहे .त्यामुळे पाणी प्रवाह सुरळीत होऊन पूर्ण क्षमेतेने पाणी दरसवाडी धरणात ४ दिवसात पोहचेल अशी अपेक्षा आहे.
बैलांची शर्यत भवली! ग्रामपंचयतीच्या उपसरंपचासह सदस्यांवर गुन्हा दाखल
दरसवाडी ते डोंगरगाव या ८८ किमी मध्ये केवळ १७ किमी मातीकाम बाकी आहे . त्यासाठी ३१ पोकलंड काम करत आहेत. येथील ४० किमी काँक्रीटीकरण काम असून काँक्रीटीकरण साठी पाणी उपलब्ध होत नसल्याने व उन्हाची तीव्रता जास्त असल्याने काँक्रीटीकरण काम संथ गतीने सुरू आहे .
मात्र दरसवाडी ते बाळापूर ही सुरुवातीची ४० किमी काँक्रीटीकरण काम अंतिम टप्प्यात असून एकूण ९ ठिकाणी एकाचवेळी काँक्रीटीकरण सुरू आहे. १५ जुलै पर्यंत पूर्ण ८८ किमी काँक्रीटीकरण पूर्ण करण्याचे संबधित यंत्रणेचे उद्दिष्ट आहे .
२०१९ साली मांजरपाडा प्रकल्पाचे भूमिपूजन मा ना छगनरावजी भुजबळ यांनी केले आणि तीन पिढ्यांची स्वप्नपूर्ती आता पूर्ण होणार असे उत्तर पूर्व भागातील शेतकऱ्यांना वाटत होते.
हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करण्याच्या तयारीत असतांना मध्यरात्री अंबड पोलिसांनी…..
मात्र २०१९ मध्ये खूप प्रयत्नांती पाणी १०३ किमी पर्यंत (बाळापूर)पोहचू शकले. पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती, कालव्यातील अनेक ठिकाणी दगडाचे उंचवटे, कालव्यातील पाण्याची कमी वहन क्षमता यामुळे २०१९ आणि त्यानंतर पुढील ४ वर्षात पाणी बाळापूर च्या पुढे सरकले नाही.
त्यामुळे या कालव्याला पाणी येणारच नाही असे या भागात वाटत असताना मा ना छगन भुजबळ यांनी कोरोणा काळात आपल्या पालकमंत्री कार्यकाळात कालव्याचे समपातळी सर्वेक्षण करून घेतले आणि याच सर्वेक्षणाच्या आधारावर आता समपातळी मध्ये विस्तारीकरण,अस्तरीकरण काम सुरू आहे.
आधुनिक यंत्रसामुग्री, एकाचवेळी अनेकठीकानी सुरू असलेली कामे, सतत कालव्यावर पाहणी दौरा, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, पाणी आंदोलक डॉ मोहन शेलार यांची सतत कालव्यावर देखरेख यामुळे कालव्याचे पूर्ण चित्र बदलून नवीन कालवा दिसू लागला असल्याने पाणी येणारच असा विश्वास या भागातील शेतकऱ्यांना वाटू लागला आहे.
यामुळे पाणी येणार या आशेने दुष्काळात हरितक्रांतीची स्वप्न शेतकरी सजवू लागला आहे.
५२ वर्षाचा कालव्याला प्रवास, दोन पिढ्यांची स्वप्नभंग झाली तरी भुजबळ साहेबांवर विश्वास ठेऊन स्वप्नपूर्तीची आशा असलेली दुष्काळाची चटके सोसणारी ही तिसरी पिढी. येणार पावसाळा हा तालुक्याचा कायापालट करत भुजबळ साहेबांची शब्दपूर्ती करणारा पावसाळा असणार आहे.
डोंगरगावला पाणी पोहचण्याची उत्कंठा आता शिगेला पोहचली असून येणाऱ्या काही दिवसात हा सुवर्णक्षण तालुक्याच्या इतिहासात साकारतो आहे….
डॉ मोहन शेलार
पाणी आंदोलक

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये