नाशिकः डिलिव्हरी बॉयची महिलेला धडक
वेगवान नाशिक / ज्ञानेश्वर सांगळे
मखमलाबाद, ता. 29 में -2024 – नाशिकच्या डोमिनोज पिझ्झाच्या डिलिव्हरी बॉईज च्या मोटरसायकली भंगार झालेल्या असूनही, प्रशासन त्या गाड्या तशाच डिलिव्हरी बॉईज ना दामटायला सांगत आहे. पर्यायाने या गाडीचे स्पेअर पार्ट ठिकाणावर नसल्यामुळे एकतर हे डिलिव्हरी बॉईज दुसऱ्यांना उडवतात किंवा हे स्वतःच अपघात ग्रस्त होतात. गाडी विषयी डिलिव्हरी बॉय नि तक्रार केल्यास गुलाम बनवलेल्या डिलिव्हरी बॉईज ना कामावरून काढण्यात येते. या भीतीपोटी डिलिव्हरी बॉईज अजिबात तक्रारी करत नाहीत. पर्यायाने अपघातांचा सामना दोन्ही बाजूंना करावा लागत आहे.
धक्कादायक ….नगर पालिकेचे काम चालू असताना फुटली गॅस लाईन परिसरात एकच धावपळ
मेरी मसरूळ येथील आउटलेट मधील एका डिलिव्हरी बॉय ने एका धुणे भांडे करणाऱ्या महिलेला उडवले महिलेचा म्हणणं असं होतं की माझ्या हाड काढत तुटलेले नाहीत ज्या जखमा झालेले आहेत त्याचाच बिल दहा हजार रुपयापर्यंत होत आहे तेवढे फक्त दे तुझ्यावर मी पोलीस कंप्लेंट करणार नाही माझी काही तक्रारी नाही कारण तू पण माझ्यासारखाच हातावरचा आहेस. असे असूनही डॉमिनोज मॅनेजमेंट नेत्या मुलाला कुठलाही सपोर्ट केला नाही डॉमिनोज मॅनेजमेंट माजर्डे आहे मुलांच्या मजबुरीचा गैरफायदा घेते आणि त्यांना त्याच मोटरसायकली वापरायला भाग पाडते.
पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालवा स्वप्नपूर्तीची उत्कंठा शिगेला…
निर्भय महाराष्ट्र पार्टीने या केस मध्ये हस्तक्षेप करत नाशिकचे सेकंड आरटीओ प्रशांत देशमुख सरांकडे नाशिकच्या सर्व डॉमिनोज पिझ्झा च्या डिलिव्हरी मोटरसायकली यांच्यावर रेड करून त्या डी बार करायला विनंती केली आहे.
हे माजरडे प्रशासन दादागिरी गुंडागर्दी माजर्डेपणा करणे जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत नाशिककरांनीच हा पिझ्झा खाणे बंद करावे. 30 मिनिटात डिलिव्हरी चा नादात ही मुलं वेगवान गाड्या चालवतात. म्हणून अपघात होत आहेत. अपघात नंतरची परिस्थिती मात्र तिचा सामना या मुलांनाच करावा लागतो. यात मॅनेजमेंट माज दाखवत मुलांनाच कोंडीत पकडत. अपघात ग्रस्त दुःखात लोटले जातात ते तर अजून वेगळी गोष्ट आहे.
जितेंद्र भावे – अध्यक्ष,निर्भय महाराष्ट्र पार्टी