नाशिक ग्रामीण

निफाड तालुक्यात शेततळ्यात बुडुन दोन‌ भावांचा मृत्यू


वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

निफाड, ता. 29 मेंं 2024-  निफाड शहरापासून जवळच ढेपले वस्तीवर शेततळ्यात बुडुन दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निफाड येथील नांदुर्डी रस्त्यालगत वस्तीवर गोपाल जयराम ढेपले यांचे मुलं प्रेम गोपाल ढेपले (वय १५) व प्रतिक गोपाल ढेपले ( वय १३ )या दोन भावांचा आज सकाळी शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेने निफाड परिसरात शोककळा पसरली आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

निफाड :- निफाड तालुक्यातून अत्यंत दुःखद बातमी आली असून निफाड येथील नांदुर्डी रस्त्यालगत वस्तीवर गोपाल जयराम ढेपले यांचे चिरंजीव प्रेम गोपाल ढेपले वय १५ व प्रतिक गोपाल ढेपले वय १३ या दोन भावांचा आज सकाळी शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेने निफाड परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोपाल ढेपले यांच्या विहिरीवरील विद्युतपंप चालू करण्यासाठी प्रतीक आणि प्रेम विहिरीवर गेले होते. मात्र बराच वेळ होऊनही मुले परत आली नाही म्हणून घरातील मंडळी शोध घेत तेथे पोहोचली. विहिरीच्या आसपास शोध घेत असताना जवळच्या शेततळ्याजवळ मुलाचे कपडे आढळून आले. त्यावरून मुले पाण्यात तर बुडाली नाही ना? ही शंका आल्याने सर्वांनी धावपळ करून शेततळ्यात शोध घेतला असता दुर्दैवाने मुले शेततळ्यात मृतावस्थेत आढळून आले.

प्रतीक हा पोहण्यासाठी कपडे काढून तळ्यात उतरला व पोहता येत नसल्याने तो बुडतांना पाहून प्रेम याने तळ्यात उडी मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना पोहता येत नसल्याने तळ्यातून बाहेर पडण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे त्याचबरोबर शेततळे गच्च भरलेले असल्यामुळे मुलांना जीव वाचवण्याची संधी मिळू शकली नाही असा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेचे वृत्त कळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे. निफाड येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात या दोन्ही बालकांची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून त्यांच्यावर निफाड येथील अमरधाममध्ये दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


अरुण थोरे

अरुण थोरे  गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून  शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!