नाशिक ग्रामीण

अखेर त्या अनोळखी महिलेची ओळख पटली !


वेगवान नासिक / उत्तम गायकर

 

इगतपुरी : मुंढेगाव शिवारातील जिंदाल कंपनी जवळील रेल्वे पुलाखाली दि. २५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास धावत्या रेल्वेखाली एका महिलेने आत्महत्या केली .

 

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

सदरची खबर रेल्वे स्टेशन मास्तर यांनी घोटी पोलीस स्टेशनला कळविली असता त्या ठिकाणी उजव्या हातावर AR अस गोंदलेल्या वर्णनाची महिला मिळून आली . संबंधित महिलेबाबत तक्रार नसल्याने अनोळखी महिला नोंद करण्यात आली.

आज सदरच्या महिलेचे नातेवाईक यांना ही गोष्ट रेल्वे कर्मचारी लोहकरे यांचे कडून कळली असता सदरच्या महिलेची ओळख पटली असून सदरची महिला अनिता रामनाथ डोखे वय ३६ वाघेरे येथील असुन गावाला जाऊन येते असे सांगुन गेली होती.

पुढील तपास पो .ह.चव्हाण ,पो.ह. दोंदे पि.आय.विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!