शेती
बागलाणः दुकानासमोरु दुचाकी लंपास
वेगवान नाशिक /आप्पा जगताप
आराई , ता. बागलाण- २९ मे २०२४
जायखेडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत मुल्हेर येथे मोटरसायकल चोरीची घटना घडली आहे.दुचाकीधारकाने आपली दुचाकी देशी दारू दुकानासमोर लावुन कामानिमित्त बाजारात गेला.
बागलाण तालुक्यात पत्नीने केला पतीचा खून
यानंतर चोरट्याने परिसरात कुणी नसल्याची संधी साधत दुचाकीचे लाॅक काढत दुचाकी अलगद पणे लंपास केली. काम संपल्यावर दुचाकी मालक पुन्हा आल्यानंतर दुचाकी न दिसल्याने शोधाशोध केली.
पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालवा स्वप्नपूर्तीची उत्कंठा शिगेला…
किंबहुना,दुचाकी धारक रंगनाथ रमेश बोरसे वय ४० राह.मुल्हेर शाईन कंपनीची मोटरसायकल क्रं. MH41 BC 2296 असुन या घटनेची पोलिसांत तक्रार दिली.अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोहवा लव्हारे करत आहे.
निफाड तालुक्यात शेततळ्यात बुडुन दोन भावांचा मृत्यू