नाशिक क्राईम
हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करण्याच्या तयारीत असतांना मध्यरात्री अंबड पोलिसांनी…..
हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करण्याच्या तयारीत असतांना मध्यरात्री अंबड पोलिसांनी.....

वेगवान नाशिक / नितिन चव्हाण :, ता,२८ मे २०२४
दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने धारदार लोखंडी तलवार बाळगणाऱ्या दोघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस शिपाई सागर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की आरोपी गोपाल मुरलीधर जाधव (वय २६) व कैलास मिलिंद सैंदाणे (वय २१, दोघेही रा. गणेश चौक, सिडको) हे दोघे जण काल (दि. २६) रात्री अडीच वाजेच्या सुमारास महेश भवनजवळ गणेश चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एका झाडाखाली दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातात लोखंडी तलवार बाळगताना मिळून आले.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
